SENSEX   34273.03    -27.44  (-0.08%)      SENSEX   31697.13    50.67  (0.16%)      |  Gold   30606.00    -136.00  (-0.44%)    |  Silver  38329.00   -224.00 (-0.58%)

Latest News:

अर्थसंकल्पाविषयी उद्योगजगतातील विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया

By
budget
अनिरुद्ध धूत, संचालक, व्हिडीओकॉन - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक संतुलित अर्थसंकल्प सादर केला आहे. पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे  दिसून आले. वित्तीय तूट निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 3.5 टक्के ठेवण्याचे लक्ष्य सरकारने जाहीर केले आहे. मोठ्या व्यवसायांवर दीर्घकाळात सकारात्मक परिणाम बघायला मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तू आणि घरघुती उपकरणे उद्योगाकडून अर्थसंकल्पाबद्दल मिश्र प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळाला आहे. कर वाद सोडविणे आणि तरतुदींचे सुलभीकरण करण्यावर सरकारचा भर असला तरी स्वयंसेवी उत्पन्नामुळे बाजारपेठ मंदावू शकते.
सरकारने उद्योगविश्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीत वाढ करण्यासाठी कॉर्पोरेट कर 25 टक्क्यांवर आणला आहे. तसेच छोटे उद्योग म्हणजेच ज्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अश्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचा दर 30 टक्क्यांवरून कमी करून 29 टक्के करण्यात आला आहे. मात्र मोठ्या उत्पादकांसाठी कॉर्पोरेट करात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. देशातील एंकदर व्यापार क्षेत्रातील वातावरण सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्कामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर आहे.
 ------------------------------------------------------------------------
चित्रा रामकृष्ण व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई.- अर्थमंत्र्यांनी एक व्यापक अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये आधुनिक डिजिटल शिक्षणप्रणाली, ई-मॉड्यूल, डिजिटल माहिती साठवण (स्टोरेज) अश्या विविध बाबींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे 'आधार कार्ड'ला कायदेशीर चौकट दिली जाणार असल्याने आर्थिक समावेशन प्रक्रिया जलद होणार होईल. कमोडिटी बाजार आणि त्यातील जाही नवीन आर्थिक उत्पादनांची घोषणा एक मोठे पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ही उत्पादने लोकप्रिय ठरतील. गिफ्ट शहर आणि इंटरनॅशनल फायनान्स सेंटरमुळे भारत जागतिक नकाशावर घट्टपणे उभा राहील.
देशांतर्गत पातळीवर शेअर बाजारातून संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. तसेच सरकारी विमा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणीचे आम्ही स्वागत करतो. अर्थसंकल्पातील सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरून भारत प्रगतीपथावर अग्रेसर राहील, अशीही आशा एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी व्याकर केली.
-------------------------------------------------------------------------------------
डॉ पवन गोयंका- (कार्यकारी संचालक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड)
अर्थसंकल्पात कृषि, ग्रामीण अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्र मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी आणि सरकारी भागीदारीचे (पीपीपी) स्वागत केले पाहिजे. ग्रामीण विद्युतीकरण आणि कृषि उत्पन्न वाढवण्याबाबत अतिशय स्पष्ट ध्येय सरकारने ठेवले आहे ही कौतुकाची बाब आहे.
त्याचप्रमाणे प्रवासी वाहनांवर  4% उपकर (सेस) लावला जाणार असल्याने ऑटो क्षेत्रासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे आहे. ऑटो क्षेत्र मात्र यासाठी तयारी करेल.
----------------------------------------------------------------------
श्री. प्रकाश छाब्रिया, कार्यकारी अध्यक्ष, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.
"ग्रामीण भागातील एकूण पायाभूत सोईसुविधांवर आणि खासकरून शेतीवर आपल्या अर्थमंत्र्यांनी योग्य भर दिला आहे. जाहीर केलेल्या कृषी अनुकूल सर्व पावलांव्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा आराखडा सादर केला आहे. आपल्या लोकसंख्येमध्ये फार मोठा भाग असलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने याचा फिर मोठा उपयोग होणार आहे. कृषी बाजारांमध्ये यामुळे सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. भारताला ज्ञानाधारित उत्पादक अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आरोग्यसेवा, शैक्षणिक कौशल्ये आणि रोजगार निर्मिती यांसह ग्रामीण क्षेत्र व सामाजिक क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. येत्या वर्षांमध्ये या पावलांमुळे पीव्हीसी पाईप आणि फिटिंग्जची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी मला अपेक्षा आहे. स्वस्त घरांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे बांधकाम क्षेत्रातही पीव्हीसी पाईप आणि फिटिंग्जची मागणी वाढतीच राहील."

Comments (0)

No comments yet.


Leave a comment

(required)

No trackbacks yet.

??????