निफ्टी 50 ची गेल्या महिन्यात (20 टक्के) घसरण झाली होती. विक्रीचा जोर बहुतांश प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये झालेल्या समन्वयित घसरणीचाच एक भाग होता. बाजारपेठेत झालेल्या घसरणीसह काही समस्या एकत्र आल्या असून त्यातून घबराट तयार झाली आहे.
- कोरोना विषाणूची भीती आणि संबंधित जागतिक विक्री
- ओपीईसी/रशिया सामन्यामुळे क्रुड तेलात झालेली घसरण
- येस बँकेची सुटका आणि इतर वित्तीय बाबींवर झालेला परिणाम
स्त्रोत: ब्लूमबर्ग, अक्सिस एमएफ संशोधन
12 मार्च 2020 रोजीची माहिती
कोविद- 19 – कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली स्थिती अतिशय अनपेक्षित असून तिच्यामुळे जगभरात उलथापालथ झाली आहे. या संसर्गाचा आर्थिक परिणाम काही आठवड्यांपूर्वी वाटला होता, त्यापेक्षा जास्त खोल झाला आहे, कारण प्रवासाशी संबंधित भरपूर मर्यादा घालण्यात आल्या असून कित्येक देशांमध्ये संपूर्ण संचारबंदी अमलात आणली गेली आहे.
लघुकालीन अडथळे मोठे ठरणार असून बाजारपेठेवर होणारा परिणाम या संसर्गाच्या मध्यम ते दीर्घकालीन अंमलबजावणीवर अवलंबून असेल. बाजारपेठेसाठी आणखी एक मोठी चिंता म्हणजे, याआधीच संथ झालेल्या अर्थव्यवस्थेचा वेग आणखी खालावेल आणि या अडथळ्यांमुळे एका दीर्घकालीन मंदीला तोंड द्यावे लागेल. केंद्रीय बँकर्स तातडीने दरात कपात करून या चिंतेवर तोडगा काढत आहेत, मात्र – आमच्या मते, दरांतील ही कपात अल्पावधीत इच्छित परिणाम साधण्यात कुचकामी ठरेल, कारण उत्पादनांसाठीची मागणी (विशेषतः विचारपूवर्क खर्च) संसर्गाची भीती कमी होईपर्यंत फारशी जोर धरणार नाही.
भारतातील रुग्णांची संख्या अद्याप कमी असली, तरी प्रतिबंधात्मक उपाय आणि जागतिक उपाययोजना यांमुळे विमानवाहतूक, पर्यटन अशा काही क्षेत्रांतील मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काही आठवड्यांत कोविद- 19 ची स्थिती कशी असेल यावरही बरंच काही अवलंबून असेल. त्याशिवाय बाजारपेठेला उच्च क्षमता असलेल्या कंपन्या आणि कमी भांडवल असलेल्या कर्जपुरवठादारांचीही चिंता आहे. येस बँकेच्या सुटकेमुळे ही समस्या परत एकदा प्रकाशझोतात आली आहे. कर्ज बाजारपेठेत परत विश्वास निर्माण करण्यासाठी आरबीआय आणि सरकारने उचललेली पावले स्थैर्यासाठी महत्त्वाची ठरतील.
गेल्या काही महिन्यांपासून आम्ही या वर्षात सक्षम आणि सशक्तच टिकून राहतील याचा पुनरूच्चार करत आहोत. लघु व मध्यम काळात बाजारपेठा कमी अस्थिर राहातील, मात्र व्यवसाय दीर्घकाळात कमी अस्थिर राहातील. सध्याच्या आव्हानात्मक काळात त्यांना छोट्या कालावधीत, एखाद्या- दुसऱ्या तिमाहीमध्ये अडचणी आल्या, तरी ते कमी अस्थिर राहातील. मजबूत ताळेबंद आणि प्रभावी धोरणासह दमदार नेतृत्व असलेल्या कंपन्या टिकून राहातील आणि अस्थिरता कमी झाल्यानंतर प्रगती करतील. अडचणीचा काळ हा सर्व व्यवसायांची खरी परीक्षा घेणारा असतो, असे आम्हाला वाटते आणि हा काळ हाताळण्याची व्यवसायाची क्षमता कशी आहे यावर त्या व्यवसायाचा टिकाऊपणा ठरतो व हीच बाब त्याला इतरांपासून वेगळं ठरवणारी असते. गुंतवणूक करताना नेमकी हीच बाब आपण लक्षात घ्यायला हवी.
दर्जा आणि अशाश्वत नावांमधे बाजारपेठ कायमच विश्लेषण करत राहील. सापळ्यात गुंतवणूक करण्याची चूक टाळणे हा आमच्या गुंतवणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक होता आणि राहील, ज्याच्या मदतीने आम्ही दीर्घकाळात टिकून राहू, प्रगती करू अशी अपेक्षा आहे.
सध्याच्या विक्रीच्या ओघात गुंतवणुकदारांनी अचानकपणे पाऊल उचलणे टाळावे. सध्याची घसरण खरेदीसाठी उत्तम संधी आहे, मात्र तिचे फलित दिसण्यासाठई तीन ते पाच वर्ष वाट पाहावी लागेल. त्याशिवाय गुंतवणुकदारांनी अवेळी जोखमीचा धोका टाळण्यासाठी पुढील तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत स्थिर गुंतवणूक करावी. मध्यम काळात या धक्क्यांतून अर्थव्यवस्था सावरेपर्यंत दमदार व दर्जेदार कंपन्या पुढील संधींचा लाभ घेण्यासाठी योग्य त्या स्थानावर असतील.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारपेठेच्या जोखमीवर अवलंबून असून, योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
- जितेश गोपानी (प्रमुख - इक्विटीज), अक्सिस एमएफ