अविवा लाइफ इन्शुरन्सने आज अॅमेझॉनच्या अॅलेक्सा व्यासपीठावरून इन्शुरन्स मेड इजीसह प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. या नव्या डिजिटल उपक्रमासह अविवा ही अॅलेक्सा स्कीलसह ग्राहकांना त्यांच्या आयुष्यातील विम्याचे प्रकरण सोपे करण्यासाठी मदत करणार आहे. अशी सेवा देणारी अविवा ही भारतातील पहिली जीवन विमा कंपनी ठरली आहे. सर्व वयोगट व सर्व भौगोलिक प्रदेशातील सध्याच्या आणि भविष्यात जोडल्या जाणा-या ग्राहकांमध्ये अॅलेक्सासह वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी प्रसार करण्याचे ध्येय कंपनीने बाळगले आहे. अविवा प्लॅन इंडिया प्लॅन सर्वेचे 2017मध्ये आयोजन करण्यात आले होते, यामध्ये भारतीय भरपूर स्वप्ने बघतात, परंतु वित्तीय योजना अंमलात आणण्याचे काम येते तेव्हा मात्र या गोष्टींना ते फाटा देतात, असे या सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आपल्याकडील विमा जगतात फार गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात आणि लोक आपल्या वित्तीय गुंतवणुकीसाठी योग्य ते निर्णय घेऊ शकत
नाहीत, हे याचे प्रमुख कारण आहे.
ही त्रुटी भरून काढून भारतात वित्तीय साक्षरता वाढावी यासाठी अविवाने इन्शुरन्स मेड सिंपल सादर केले आहे, हा अॅलेक्साचा एक स्कील सेट आहे, यामुळे ग्राहकांना विविध गुंतागुंतीच्या विमा टर्म्स अत्याधुनिक डिजिटल नावीन्यपूर्णतेसह समजावून दिल्या जाणार आहेत – यात व्हॉइससह कमांड देता येणार आहे. उदाहरणार्थ, एखादा ग्राहक अॅलेक्सा डिव्हाइसवर अविवा लाँच करेल, यासाठी अॅलेक्सा ओपन/लाँच अविवा अशी वेगळे संकेतशब्द वापरेल आणि यानंतर ``विमा म्हणजे काय’’, ``सरेंडर बेनिफिट म्हणजे काय’’ यासारखे प्रश्न विचारू शकतो, या प्रश्नांना अॅलेक्सा लगेचच उत्तरेही देईल. विम्यामध्ये वापरले जाणारे किचकट शब्द अतिशय सुलभ पद्धतीने ग्राहकांना समजावेत, विम्याची भाषा समाजावी यासाठी हे उत्पादन सज्ज करण्यात
आले आहे.
या विकासाबद्दल अविवा लाइफ इन्शुरन्सच्या ग्राहक, वितरण प्रमुख आणि डिजिटल अधिकारी अंजली मल्होत्रा म्हणाल्या की, ``अविवाने नेहमीच डिजिटल आणि नावीन्यपूर्णता यांना महत्त्व दिले आहे, तसेच भारतात वित्तीय साक्षरता वाढावी असे आमचे ध्येय आहे. विमा जगतात अनेक गुंतागुंतीचे व्यवहार असतात आणि जीवन विम्याबद्दल आमच्या ग्राहकांना योग्य माहिती देऊन मगच त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निर्णय घ्यावा असा प्रयत्न आम्ही करत असतो. विमा जगत अधिक सोपे करून, आमच्या ग्राहकांनी त्याचा स्वीकार करणे आणि भारतात संरक्षण कवचाच्या या क्षेत्रात जास्तीत-जास्त प्रवेश होणे हे आमचे ध्येय आहे. अविवाने आमच्या अस्सल आनंददायी ग्राहक अनुभवासाठी डिजिटल रोडमॅपचा भाग म्हणून एक वेगळी व पहिली नावीन्यपूर्णता साधली आहे.’’ असेही त्या पुढे म्हणाल्या.
आजच्या घडीला विमा उद्योगक्षेत्रात डिजिटायझेशन झाल्याने अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सुलभ झाल्या आहेत, त्याची सक्षमता वाढली आहे आणि संपूर्ण मूल्य शृंखलेत त्या सक्षम झाल्या आहेत. व्हॉइस कमांडद्वारे ग्राहक सेवा हे यातील पुढचे पाऊल आहे, यामुळे ग्राहकांना या प्रक्रियेत अधिकाधिक सामावून घेतले जाते. अविवाने, ग्राहकांना अनेक कठीण गोष्टी समजण्यास अडचण येते आणि ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत हे जाणले. यामुळेच ही सेवा सादर करून कंपनीने सर्वांसाठी कुठल्याही अडथळ्याशिवाय विमा अधिक सुलभ प्रकारे उपलब्ध करून दिला आहे.