आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्सने मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत 228 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. कंपनीच्या नफ्यात 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्सला 212 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा एकूण महसूल 2,519.72 कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीला 2,066.64 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 3.50 रुपये प्रति शेअरचा डिव्हिडंड जाहीर केला आहे. 31 मार्च 2019 अखेर कंपनीचे सोल्व्हन्सी गुणोत्तर 2.24 एक्स इतके आहे. तर 31 डिसेंबर 2018 ला कंपनीचे सोल्व्हन्सी गुणोत्तर 2.12 एक्स इतके होते. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च 2018 ला कंपनीचे सोल्व्हन्सी गुणोत्तर 2.05 एक्स इतके होते.