सर्वसाधारण विमा क्षेत्रातील सर्वाधिक मोठी खासगी कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने डिजीटल पेमेंटमधील आघाडीची कंपनी फोन-पेबरोबर भागीदारी करत स्थानिक प्रवासासाठी अवघ्या 499 रुपयांत व्यापक स्वरुपाचे मल्टी ट्रीप वार्षिक विमा पॉलिसी आणली आहे.
सर्वांना परवडण्याजोगे हे वार्षिक विमा कवच अमर्यादीत फेऱ्यांसाठी आहे. हे अनोखे विमा कवच पारंपारिक प्रवासी विमा कवचापेक्षा अधिक सरस असून प्रत्येक फेरीसाठी वेगळा विमा उतरविण्याची झंझटच दूर करण्यात आलेली आहे. ही सुविधा व्यावसायिक तसेच नियमित आरामदायी भ्रमंती करणाऱ्यांसाठी लाभदायक तसेच सोयीची ठऱणार आहे. रस्ते, रेल्वे आणि देशांतर्गंत विमान प्रवास आदी विविध प्रवासात असलेल्या जोखीमेला विमारुपी संरक्षणाचा लाभ आणि तणावमुक्त प्रवासाचा अनुभव या नवीन विम्यामुळे मिळणार आहे. प्रवासाला घरातून बाहेर पडल्यापासून ते घरात पुन्हा येईपर्यंतच्या कालावधीत विमा कवचाचा लाभ मिळणार आहे.
कोविड-19 च्या भीतीमुळे सध्या देशांतर्गत प्रवासासाठीसुध्दा घराबाहेर पडण्यास घाबरणाऱ्या नागरिकांसाठी हे अनोखे विमा कवच एकाच पॉलिसीआधारे अनेक व्यापक लाभ देणार आहे. त्यात प्रवास रद्द होणे, प्रवासादरम्यान घरफोडी होणे, कनेक्टींग फ्लाईट चुकणे, बॅग गहाळ होणे आणि अन्य प्रसंगांसाठीसुध्दा विम्याचे संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर प्रवासात अपघातामुळे मृत्यू झाल्यास अथवा रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. 365 दिवसांसाठी अवघ्या 499 रुपयांत हे विमा कवच अतिशय अल्प किंमतीत आणि विना झंझट विविध प्रकारच्या प्रवासासाठी महत्वपुर्ण असे संरक्षण ग्राहकाला देत आहे.
आपल्या या अनोख्या विमा प़ॉलिसीच्या घोषणेवेळी बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, की अनोख्या प्रकारच्या या पहिल्यावहिल्या प्रवासी विमा पॉलिसीसाठी फोनपेबरोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेच्यावेळी मदत करणे हे आयसीआयसीआय लोम्बार्डचे उद्दीष्ट असून आमच्या ब्रॅण्डचा 'निर्भय वादे' हा वादा त्यामुळे प्रत्यक्षात उतरत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत आपण सर्व जण आपल्या जीवनाचा पुनश्च श्रीगणेशा करत असताना आमची ही नवीन पॉलिसी देशातील असंख्य प्रवाशांना फायदेशीर ठरताना त्यांना दुर्दैवी प्रसंगापासून संरक्षण प्रदान करणार आहे. मल्टी-ट्रीप आणि मल्टी-मोड प्रकारामुळे ही विमा पॉलिसी सतत प्रवासात असणाऱ्यांसाठी सुटसुटीत, कमी खर्चिक आणि मनाला भिडणारी ठरणार असल्याचा दावा मंत्री यांनी केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना फोनपेच्या विमा विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख गुंजन घई म्हणाले, की ग्राहकांसाठी काळानुरुप आणि स्थितीपुरक उत्पादने आणण्याची फोनपेची पंरपरा यातुन पुन्हा प्रकट होते. स्थानिक प्रवाशांसाठी हे अनोखे आणि विमा क्षेत्रातील पहिल्यांदाच असे विमा संरक्षण देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या नव्या विम्यात वर्षभरासाठी अमर्यादीत फेऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या प्रवासाचा समावेश असुन सध्याच्या अनलॉक वन कालावधीतही उपयपक्त ठरणारी वैशिष्टे त्यात आहेत. या विमा पॉलिसीमुळे विमाधारकांना मानसिक शांतता लाभणार असून त्यामुळे ते सफरीचा विनाचिंता आनंद घेऊ शकतील, असा आम्हाला विश्वास आहे. विमा फोनपेच्या 20 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना परवडण्याजोगा, सुटसुटीत आणि सहज उपलब्ध होणारे विमा कवच देण्यास आम्ही वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
फोन-पेचे ग्राहक फोनपे अॅपमधील माय मनी विभागातून ही मल्टी-ट्रीप विमा पॉलिसी खऱेदी करु शकतील. विमा पॉलिसी उतरविण्याची प्रक्रिया अवघ्या दोन मिनिटात पुर्ण होते आणि ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे कागदपत्र फोनपे अॅपवर लगेच वितरित केले जातात.