'प्री एक्झिस्टिंग' किंवा जुन्या किंवा अनुवांशिक आजारांचे कारण सांगून आरोग्य विम्याचा क्लेम नाकारणाऱ्या कंपन्यांना चाप लावणारा मोठा बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. विमा नियामक संस्था 'आयआरडीए'ने यासंदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्वांची नियमावली तयार केली असून हा निर्णय लवकरच अंमलात येणार आहे.
ज्या ग्राहकांनी 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आरोग्य विमा घेतला आहे आणि त्याचे शुल्क वेळेवर भरले जात आहे अशा ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. याशिवाय मेंटल ट्रीटमेंट संदर्भात देखील काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण नागरिकांच्या आयुष्यात क्रांतिकारक ठरावेत असे आरोग्य विमा क्षेत्रासंबंधीचे बदल आयआरडीएने सुचविले आहेत. यासंदर्भात 31 मे पर्यंत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या आहेत.