प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक भरभराटीची संधी उपलब्ध झाल्याने अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत.
‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू झाली आहे. याद्वारे सुरवातीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध झाली आहेच;
पण त्याचबरोबर म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही वाचायला मिळत आहेत. म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा वाढलेला कल लक्षात घेऊन अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी एजंट, पिग्मी एजंटांना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती पात्रता परीक्षा आणि प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाची साथ ‘सकाळ मनी’कडून मिळणार आहे.
‘सकाळ मनी’सोबत एजंट म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी ९८८१०-९९ २०० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. शिवाय गुंतवणूकदारांनी ‘सकाळ मनी’च्या मार्गदर्शनासाठी ७३५०८-७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.