प्राप्तिकर विवरण पत्र (रिटर्न) भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न दोन प्रकारे भरू शकता. यापैकी स्वत: प्राप्तिकर खात्याच्या ऑफीस मध्ये जाऊन प्रत्यक्षात रिटर्न्स फाइल करणे किंवा दुसरा सोपा पर्याय म्हणजे ऑनलाइन टॅक्स रिटर्न फाइल करणे. याला ई- फाइलिंग असे म्हणतात. www.incometaxindiaefiling.gov.in या बेवसाइटला भेट देऊन ई-फायलिंग करता येते. आईटीआर फाइल करतेवेळी योग्य फॉर्मची निवड करावी लागते. तसेच पॅन कार्ड, फॉर्म क्रमांक १६, बँकेतील खाते, पगाराची पावती इत्यादी कागदपत्रे तयार ठेवायला हवीत.तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमधे मोडता ती माहिती असल्यास ई- फाइलिंग करणे अगदी सोपे बनून जाते.
ऑनलाइन टॅक्स रिटर्न फाइल करतानाच्या स्टेप्स :
प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करा.
पॅन कार्डचा क्रमांक तुमचा यूजर आयडी असेल.
फॉर्म क्रमांक १६, फॉर्म क्रमांक २६ एएस, बँकेच्या स्टेटमेंट्स, गेल्यावर्षी फाइल केलेल्या रिटर्नची कॉपी, म्युचुअल फंडाच्या कॅपिटल गेनच्या स्टेटमेंट्स ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
डाऊनलोड टॅबवर जाऊन आईटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर (जावा किंवा एक्सेल यूटीलिटी) डाऊनलोड करा.
या सॉफ्टवेअरच्या आधारे रिटर्न तयार करा. प्री-फील बटणावर क्लिक करा. आपली वैयक्तिक माहिती व टॅक्स पेमेंटविषयीची सर्व माहिती भरा.
कोणतीही माहिती भरायची बाकी तर नाही ना याची दक्षता घ्या. संपूर्ण माहिती भरल्यानंतर टॅक्स व इंट्रेस्ट लायबिलीटी आणि टॅक्सटची अंतीम आकडा मोजण्यासाठी कॅलक्युलेट ऑप्शनवर क्लिक करा.
टॅक्स भरायचा बाकी असेल तर त्याचवेळी भरा. त्यासंबंधीत सर्व माहिती द्या.
वरील सर्व गोष्टी पुन्हा करा. जेणेकरून तुमचा टॅक्स पेएबल होईल. सर्व माहिती योग्य त्या ठिकाणी आली की आईटीआर डेटा XML फॉरमॅटमध्ये फाइल सेव्ह करा.
ई- फायइलिंग बेवसाईटवर लॉग इन करा. ई-फाइल ऑप्शनवर जा. अपलोड रिटर्नवर क्लिक करा. त्यानंतर योग्य आईटीआर क्रमांक, असेसमेंटचे वर्ष आणि आधी सेव्ह केलेली XML फाइल निवडा.
तुमच्याजवळ डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट असेल व ते रजिस्टर केलेले असेल, तर ते अपलोड करा. सबमिट बटणावर क्लिक करा.
तुमची केलेली प्रक्रिया पूर्ण झाली असे मानले जाईल.
ऑनलाइन आईटीआर फाइल केल्यानंतर प्रत्यक्ष कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्ही प्रिंटेड व सही केलेला आईटीआर-वी फॉर्म आयकर विभागाच्या सीपीसी, बेंगळुरुला १२० दिवसाच्या आत पाठवा.
तुम्ही जर डिजीटल सर्टिफिकेट वापरले नसेल तर आईटीआर-वी ला डाऊनलोड करावे लागेल. एटीएम- नेटबँकिंग आणि आधार कार्डच्या आधारित ओटीपीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक वेरिफिकेशन कोड जनरेट करू शकता.