गुंतवणूक क्युम्युलेटिव्ह एफडीज की नॉन क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये करावी?
सध्याच्या काळात गुंतवणूकदारांच्या नजरेतून पाहता, गुंतवणूक ही केवळ केवळ बचतीचे साधन राहीलेले नाही तर ते आता उत्पन्नाचेही चांगले साधन बनले आहे. तरीही प्रत्येक गुंतवणुकीमध्ये धोका हा काही प्रमाणात असतोच. परिणामी गुंतवणूकदार नेहमी आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी चढउतार असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असतो. हे करण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे आपली गुंतवणूक विविध ठिकाणी करणे म्हणजेच मालमत्तेच्या एकाच प्रकारात गुंतवणूक करू नये.
रोखे आणि इक्विटीजसारख्या अधिक धोका असलेल्या पर्यायांचा वापर केल्यास गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो पण फिक्स्ड डिपॉझिटसारख्या कमी धोकादायक पर्यायांमुळे स्थैर्य प्राप्त होऊन बाजारातील चढउतारांचे तसेच अस्थिरतेपासून तुमच्या गुंतवणूकीचे संरक्षणही होताना दिसते. ज्यावेळी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असते त्यावेळी यातून अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही यात क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह अशा पर्यायांची निवड करू शकता आणि आपल्या गरजा पूर्ण करू शकता.
क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे काय ?
नावाप्रमाणेच ज्यावेळी तुम्ही क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवता त्यावेळी तुम्हाला चक्रवाढ वाढीचा लाभ मिळतो. ज्यावेळी तुम्ही क्युम्युलेटिव्ह एफडीजमध्ये पैसे गुंतवता त्यावेळी तुमच्या एकूण कालावधीतील पहिल्या वर्षाचे व्याज हे दुस-या वर्षाच्या मुद्दलात जोडले जाते व त्यानुसार व्याजाचे गणित मांडले जाते. म्हणूनच जसजशी वर्षे वाढत जातात तसतसा व्याजातून येणारे उत्पन्न वाढतांना दिसते. पण हे लक्षात असू द्या की क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपल्याला मुदत संपल्यावरच व्याज मिळते, जरी व्याजाची गणना वर्षाला किंवा सहा महिन्यांनी होत असली तरीही. हे कधीकधी तुमच्या एफडीच्या प्रकारावरही अवलंबून असते.
जर गुंतवणुकीचे लक्ष्य हे मालमत्ता तयार करणे असेल तर हा पर्याय अतिशय सुयोग्य असा आहे. मग तुम्ही निवृत्तीसाठी पैसा गोळा करत असाल किंवा लक्झरी कार किंवा घर यांसाठी पैसे जमा करत असाल तर क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय ठरतो.
नॉन-क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय ?
नॉन क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे यामध्ये तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवता येते. म्हणजेच परिपक्वतेला एकरकमी मोठी रक्कम मिळण्योपक्षा तुम्हाला तुमच्या निवडीनुसार थोड्या थोड्या कालावधीनंतर पैसे मिळतात. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या नियतकालिकाची वर्गणी दरमहा, प्रत्येक तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वार्षिक अशा पर्यायांनी भरतो त्याचप्रमाणे आपल्याला पैसे मिळत राहतात. पण यांत एक गोष्ट अशी की नॉन क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट मध्ये एकूणातच व्याजदर कमी मिळतो, व चक्रवाढ पध्दतीने तो मिळू शकत नाही.
जर तुम्हाला नियमित कालावधीत पैशांची गरज भासणार हे माहित असेल तर तुम्ही या प्रकारे पैसे गुंतवू शकता. उदाहरणार्थ निवृत्त वरिष्ठ नागरिक जे आपल्या पगाराला पर्याय म्हणून या पर्यायाचा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही मुक्तपणे काम करत असाल आणि तुम्हाला एक स्थीर उत्पन्न हे महिन्याला किंवा तीन महिन्यांनी गरज असेल मग तुम्ही कितीही काम करत असाल तरीही हा पर्याय उत्तम ठरतो.
फिक्स्ड डिपॉझिटच्या पर्यायाची निवड ही आपल्या गरजेनुसार करायची असते. ज्या गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्नाची गरज असते ते नॉन क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू शकतात तर ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज नसते ते क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतात.
तुम्ही कोणताही प्रकार निवडा, फिक्स्ड डिपॉझिटचे अनेक फायदे आहे, म्हणूनच हा सर्वाधिक लोकप्रिय असा गुंतवणूक पर्याय म्हणून या प्रकारांची गणना होते. नुकतीच व्याजदरांतील होणारी वाढ पाहता आता फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याची ही अतिशय योग्य वेळ असून यामुळे अधिकतर उत्पन्न यातून मिळू शकेल.
सचिन सिक्का, रिटेल आणि कॉर्पोरेट लायाबिलिटीज विभागाचे व्यवसाय प्रमुख,
बजाज फायनान्स लिमिटेड