मुंबई: आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (एबीएसएलआय) या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (एबीसीएल) या महत्त्वाच्या नॉन-बँक वित्तीय सेवा कंपनीच्या आयुर्विमा कंपनीने एबीएसएलआय गॅरन्टीड माइलस्टोन प्लानवर उच्च, खात्रीशीर उत्पन्न देण्याचे जाहीर केले आहे. हा प्लान घेतल्याने ग्राहकांना उच्च उत्पन्न मिळवता येऊ शकते. या प्लानमध्ये आता वाढीव खात्रीशीर उत्पन्नाचा समावेश केला असून, त्यामुळे दरवर्षी निधीमध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे व मृत्यू झाल्यास संपूर्ण निधी देण्याची हमी दिली जाणार आहे.
तेजी-मंदी आणि अनिश्चित आर्थिक क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर, जीवनातील महत्त्वाच्या उद्दिष्टांचे संरक्षण करणे, हे एबीएसएलआय गॅरन्टीड माइलस्टोन प्लानचे उद्दिष्ट आहे. हा प्लान मृत्यू व मुदतपूर्ती या वेळी संपूर्ण उत्पन्न देण्याची खात्री देतो आणि ग्राहकांच्या बचतीविषयीच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तो तयार केला आहे. हा प्लान गुंतवणुकीच्या कोणत्याही जोखमीविना मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक पर्याय (शॉर्ट पेज) उपलब्ध करतो.
याविषयी बोलताना, आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदित्य बिर्ला कॅपिटलचे डेप्युटी सीई पंकज राझदान यांनी सांगितले, “खनिज तेलाचे वाढते भाव, रुपयाचे घटते मूल्य व जीवनातील वाढती अनिश्चितता असा चढ-उतारांचा कालावधी विचारात घेता, जीवनातील उद्दिष्ट्ये व जबाबदाऱ्या यांचे नियोजन करत असताना, खात्रीचे फायदे व उत्पन्न देणाऱ्या उत्पादनांचा समावेश असणे आवश्यक आहे. या दृष्टीने, आम्ही एबीएसएलआय गॅरन्टीड माइलस्टोन प्लान या सध्याच्या उत्पादनामध्ये नव्या गोष्टी समाविष्ट केल्या असून, त्यामुळे ग्राहकांना इतक्या तेजी-मंदीच्या काळात शांततापूर्ण व सुरळीत जीवन जगण्यासाठी, त्यांच्या वित्तीय गरजा व मैलाचे टप्पे यांना चांगल्या प्रकारे संरक्षण देण्यासाठी खात्रीचे उत्पन्न दिले जाणार आहे.”
या उद्योगामध्ये पहिल्यांदाच, हा प्लान जॉइट लाइफ प्रोटेक्शन हा पर्याय निवडून जोडीदारालाही विमाकवच देण्याचा विशेष लाभ देतो – या पर्यायामध्ये हा प्लान विमाकवच घेणाऱ्यांना डेथ बेनिफिटही देतो व मुदतपूर्तीची रक्कमही. रायडर घेऊन ही योजना अधिक सक्षम करता येऊ शकते.
स्वतःसाठी व जोडीदारासाठी खात्रीची बचत करण्याबरोबरच, हा प्लान प्रीमिअम भरण्याचा कालावधी निवडण्याबाबत लवचिकता देतो व अतिरिक्त प्रीमिअम भरून योग्य रायडर पर्यायाच्या मदतीने विम्याचे कवच वाढवतो.
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचा एबीएसएलआय गॅरन्टीड माइलस्टोन प्लान सर्वांसाठी तयार केला आहे; गुंतवणुकीमध्ये वैविध्य आणण्यास व बचत करण्यास मदत करण्यापासून जीवनातील उद्दिष्टे व मैलाचे टप्पे यांना संरक्षण देण्यापर्यंत. अन्य विकसित देशांच्या तुलनेत, भारतात वित्तीय संरक्षणाच्या बाबतीत प्रचंड तफावत आहे; त्यामुळे विविध उत्पादनांद्वारे बचत व संपत्ती यांना संरक्षण देण्याबरोबर, भारतात जागृती करण्याचा व विम्याचे प्रमाण वाढवण्याचा एबीएसएलआयचा सातत्याने प्रयत्न आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एबीएसएलआय) ही आदित्य बिर्ला कॅपिटल लि.ची (एबीसीएल) उपकंपनी आहे. एबीएसएलआयची स्थापना ऑगस्ट 4, 2000 रोजी झाली आणि जानेवारी 17, 2001 रोजी कंपनीने कार्य सुरू केले. एबीएसएलआय ही आदित्य बिर्ला समूह व कॅनडातील आघाडीची आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी सन लाइफ फिनान्शिअल इंक. यांच्यातील 51:49 संयुक्त भागीदारी कंपनी आहे.