लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) 2018-19 या आर्थिक वर्षासाठी पूर्व विभागातून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट ठेवले आहे. एलआयसीचे विम्याच्या हफ्त्यातून मिळणारे उत्पन्न दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दीष्ट असल्याचे मत, एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक ए के शर्मा यांनी व्यक्त केले. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत पहिल्या हफ्त्यातून एलआयसीला 2,165 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मागील वर्षाशी तुलना करता यात कोणतीही वृद्धी झालेली नाही. पूर्व विभागाच्या कामगिरीबाबत बोलताना शर्मा म्हणाले की विम्याच्या हफ्त्यातून 31 ऑगस्टपर्यत मिळालेले उत्पन्न 2,050 कोटी रुपये होते. एलआयसीच्या विक्री झालेल्या पॉलिसींची संख्या लक्षात घेता पूर्व विभाग देशात पहिल्या क्रमांकावर आहे आणि मिळालेल्या उत्पन्नाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विम्याच्या पहिल्या हफ्त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात एलआयसीचा बाजारातील हिस्सा 70 टक्के इतका आहे.