- रोशन थापा, प्रिंसिपल ऑफिसर, सकाळ बीमा
कोविड १९च्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विमा घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि ज्यांच्याकडे अगोदरच आरोग्य विमा पॉलिसी आहे त्यांना कोविड १९ आजाराच्या समावेशाबद्दल अनेक शंका असल्याने विश्वासार्ह सल्ल्यासाठी 'सकाळ बीमा'ला संपर्क करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या - जुन्या अशा सर्व पॉलिसीधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून 'सकाळ बीमा' हा प्रयत्न करत आहे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्याची गरज का?
दीर्घकालीन लॉकडाउनचा पर्याय व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याने दैनंदिन उपजीविकेसाठी आपल्या सर्वांनाच घराबहेर घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र, संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोना महामारीवर अजून कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध विकसित झालेले नाही. परिणामी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्क, हातांची स्वछता, शाररिक अंतर राखणे हेच यावरील प्रमुख उपाय आहेत. मात्र, एकंदरीत कोरोनाचे स्वरूप पाहता संसर्गाचे प्रमाण वाढत आहे अशावेळी संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी आरोग्य विमा असणे महत्त्वाचे झाले आहे.
विद्यमान पॉलिसीमध्ये कोविड १९ आजाराचा समावेश आहे का?
कोविड १९ हा श्वसनाशी संबंधित आजार असल्याने आणि विमा नियामक संस्था आयआरडीएने सर्व आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड १९ चा समावेश करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्या असल्याने विद्यमान आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड १९ला देखील संरक्षण मिळते. नव्याने पॉलिसी घेऊ इच्छिणारे पॉलिसी घेताना कोरोनाबाधित असू नये ही महत्त्वाची अट आहे.
कोविड १९ संरक्षणाअंतर्गत कोणत्या बाबींचा समावेश आहे?
आरोग्य विमा घेणाऱ्या पॉलिसीधारकाला कोविड १९ संबंधित सर्व उपचारांवर संरक्षण मिळणार आहे. जसे की, रुग्णालयातील उपचार, प्री हॉस्पिटॅलायझेशन, पोस्ट हॉस्पिटॅलायझेशन, अँब्युलन्स चार्जेस.
कोविडची टेस्टिंग /चाचणी करण्यासाठी येणार खर्च देखील यात समाविष्ट आहे का?
नाही. चाचणीचा समावेश डायग्नॉस्टिक / निदान खर्चाअंतर्गत होत असल्याने त्या खर्चावर संरक्षण मिळत नाही. परंतु, जर रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह येऊन त्याला रुग्णालयात दाखल केले तर, प्री हॉस्पिटॅलायझेशनअंतर्गत या रकमेवर देखील संरक्षण मिळते. त्याशिवाय, ज्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) खर्च समाविष्ट आहे अशा पॉलिसीअंतर्गत देखील डायग्नॉस्टिक खर्च मिळू शकतो.
कोविड १९ला संरक्षण देऊ शकणाऱ्या स्वतंत्र विमा पॉलिसीज आहेत का ?
होय. अनेक कंपन्यांनी कोविड १९ संबंधित स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणल्या आहेत. याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या 'पॉईंट ऑफ सेल्स पर्सन'ला संपर्क करण्यासाठी 73508 - 73508 या क्रमांकावर मिस्ड काॅल द्या.
पॉलिसीमध्ये क्वारंटाईन कालावधी संरक्षित /कव्हर केला जातो का?
होय. अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार कोविड केंद्रात / कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये क्वारंटाईन कालावधी कव्हर केला जातो. मात्र, होम क्वारंटाईन किंवा कोविड केंद्रांव्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या क्वारंटाईनला संरक्षण मिळत नाही.
कॅशलेस आणि रीएम्बर्समेंट /प्रतिपूर्ती सुविधा आहे का?
होय.
कोविड १९ उपचारासाठी अंदाजे किंमत खर्च येऊ शकतो.?
कोविड १९ उपचारासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधी गृहीत धरून महानगरे म्हणजेच टियर १ शहरांमधील खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. तर, टियर ३ शहरे म्हणजे ग्रामीण आणि निम्न शहरी भागात हा खर्च दोन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तथापि, मधुमेह, बीपी, ह्रदयाशी संबंधित इतर आजार असणाऱ्यांसाठी या खर्चात वाढ होऊन तो १५ ते २० लाख रुपयांपर्यंत देखील येऊ शकतो.
-----------------------------------------------------------------------
योग्य विमा पॉलिसी निवडताना घ्यावयाची काळजी:
आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी : बहुतेक कोविड १९ प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल /भरती करावे लागते. त्यामुळे आयपीडी (इन पेशंट डिपार्टमेंट) खर्चाचे संरक्षण हवे असते. त्याचबरोबर, डायग्नोस्टिक खर्चाचा समावेश व्हावा यासाठी ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) खर्च देखील संरक्षित केला जाईल याची काळजी घ्यावी.
एकूण संरक्षण (कव्हरेज अमाऊंट) : अगोदर नमूद केल्याप्रमाणे, शहर आणि रुग्णाच्या आजारानुसार विमा संरक्षण रक्कम २ लाख ते २० लाख रुपये असू शकते. त्यामुळे विमा सल्लागाराच्या आधारे पॉलिसी निवडणे योग्य. 'सकाळ बीमा'चे अनुभवी सल्लागार तुमच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन योग्य ती पॉलिसी निवडण्यास मदत करतील.
को -पेमेंट / रूम रेंट (सह-वेतन आणि खोली भाडे ) : एकूण आलेल्या बिलापैकी काही रक्कम भरणे म्हणजे को -पेमेंट. शक्यतो को -पेमेंटचा पर्याय असलेल्या पॉलिसी टाळाव्यात. कारण काही लाख रुपये बिल आल्यास पॉलिसीधारकाला देखील १० ते २० टक्के रक्कम भरावी लागते. परिणामी ही रक्कम देखील लाखांच्या घरात जाऊन ज्या उद्देशाने विमा घेतला तो पूर्ण होत नाही.
अनेक पॉलिसींमध्ये हॉपस्पिटलमधील खोली भाड्यावर मर्यादा असतात. मात्र, कोविड १९ आजारामध्ये रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवले जाते. परिणामी हा खर्च अधिक असतो. त्यामुळे पॉलिसी घेताना याचा विचार होणे आवश्यक आहे. ज्या पॉलिसीमध्ये खोली भाड्यासाठी कोणतीही मर्यादा नसेल अशी पॉलिसी निवडणे उत्तम.
कंझ्यूमेबल्स : बहुतेक पॉलिसींमध्ये ग्लोव्ह्ज, मास्क सारख्या एकवेळ लागतील अशा कंझ्यूमेबल वस्तूंचा समावेश नसतो. कोविड १९मध्ये विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या वस्तू अनेकवेळा वापरल्या जातात. त्यामुळे पॉलिसी घेताना याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
कोविड १९पासून स्वतः;ला आणि कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी मास्क, हातांची स्वछता आणि शाररिक अंतर राखण्याबरोबरच कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. आरोग्य विम्याच्या योग्य पॉलिसीची निवड किंवा विद्यमान पॉलिसीसंदर्भात कोणत्याही माहितीसाठी 'सकाळ बीमा'शी निःसंकोच संपर्क करा.
---------------------------------------------------------------------
... तर मात्र विमा संरक्षण मिळणार नाही
* रुग्णाला अगोदरच श्वसनाशी संबंधित आजार असल्यास
* रुग्ण किंवा कुटुंबातील सदस्यांची कोरोनाबाधित क्षेत्रात ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर
* रुग्णामध्ये पूर्वीपासून कोल्ड /सर्दी संबंधित लक्षणे असल्यास
* पॉलिसीच्या वेटिंग पिरयड / प्रतीक्षा कालावधी दरम्यान हा आजार झाल्यास