आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने आपल्या ग्राहकांना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर इनपेशंट दाव्याकरिता ३० दिवसांचा प्रतिक्षा कालावधी कमी करून १५ दिवसांवर आणला आहे. तसेच कोविड-१९ रुग्णांनी हॉस्पिटलायझेशनसाठी दावा केला तरीही त्यांना नो क्लेम बोनस दिला जाणार असून घरी घेतलेल्या उपचारांसाठी करण्यात आलेल्या दाव्यांना होम हेल्थकेअर लाभ दिला जाणार आहे. यामुळे कंपनीच्या कम्प्लीट हेल्थ इन्शुरन्ससारख्या विद्यमान उत्पादनांची उपयुक्तता अधिक वाढली आहे.
नव्याने समाविष्ट लाभांवर एक दृष्टिक्षेप
नवीन पॉलिसींसाठी असलेला प्रतीक्षा कालावधी कोविडशी निगडित इनपेशंट दाव्यांकरता १५ दिवस (यापूर्वी ३० दिवस होता) करण्यात आला होता.
हप्त्यामध्ये कोणत्याही प्रकारे वाढ न करता प्रतिक्षा कालावधी कमी करण्याची ऑफर दिली जात आहे.
हा लाभ सर्व आरोग्य संरक्षण पॉलिसींना लागू होईल. यांमध्ये कम्प्लीट हेल्थ इन्शुरन्स, हेल्थ बूस्टर, हेल्थकेअर प्लस आणि ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजनांचा समावेश आहे.
● होम हेल्थकेअर लाभ
o या योजनेचा भाग म्हणून, ग्राहकांना दावा करण्यासाठी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची आवश्यकता नाही. घरात राहून घेतलेल्या उपचारांसाठीही ते भरपाईचा दावा करू शकतात.
o यामुळे रुग्णालयात दाखल होण्याऐवजी घरातील सुरक्षित वातावरणात, सोशल डिस्टन्सिंग राखून, उपचार घेऊ इच्छिणा-या ग्राहकांना लक्षणीय फायदा होणार आहे.
● कोविड-१९शी निगडित दावा करूनही ‘नो क्लेम बोनस’ मिळणार
o कोविड-१९वरील उपचारांसाठी दावा करूनही ग्राहकाला कंपनी ‘नो क्लेम बोनस’ देणार आहे.
o विमा काढलेली व्यक्ती कोविड-१९मुळे रुग्णालयात दाखल झाली असेल तर तिला पॉलिसीसाठी दिल्या जाणा-या अतिरिक्त हमी रकमेवरही (एएसआय) काही परिणाम होणार नाही. यामुळे ग्राहकाला अत्यंत गरजेचा असलेला आर्थिक दिलासा मिळेल.
o हा लाभ आयसीआयसीआय लोम्बार्डच्या कम्प्लीट हेल्थ इन्शुरन्स आणि हेल्थ बूस्टर योजनांसाठीही दिला जाईल.