ग्रामीण भारतातील नागरिकांच्या क्रयशक्तीत प्रचंड वाढ झाली आहे. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) 47 टक्के वाटा ग्रामीण भागाचा आहे. यामुळे पुढील काळात तेच भारताची आर्थिक दिशा ठरवणार आहेत, असे मत महिंद्रा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिष्णोई यांनी व्यक्त केले. महिंद्रा म्युच्युअल फंडाने ग्रामीण भागाशी निगडित 'महिंद्रा रुरल भारत अँड कन्झम्पशन योजना' नुकतीच सादर केली. यावेळी ते बोलत होते.
एकेकाळी उत्पन्नासाठी संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भारताचे आजचे चित्र मात्र वेगळे आणि सुखावह आहे. खासगी आणि सहकारी तत्वावर सुरू असलेल्या दूध डेऱ्या आणि कारखाने, अन्न प्रक्रिया करणारे उद्योग तसेच सरकारी आणि खासगी रोजगारात झालेली वाढ यामुळे उपजीविकेसाठी लोकांचे शेतीवरचे अवलंबित्व कमी झाले आहे. उत्पन्नाचे विविध पर्याय निर्माण झाल्याने खरेदीशक्तीत प्रचंड वाढ झाली आहे. महानगरांपुरते मर्यादित असलेले मॉल्स, दुचाकी- चारचाकी वाहनांची डिलरशिप, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स यांनी आपली दालने निमशहरी भागात सुरु केली आहेत. अगदी साध्या खाद्य पदार्थांपासून ते मोठमोठी वाहन निर्मिती करणारी उद्योगव्यवसाय देखील आपल्या मालाचे उत्पादन घेताना ग्रामीण ग्राहकाचा विचार डोळ्यासमोर ठेवून उत्पादन घेत आहेत. त्यामुळे, देशातील उद्योगधंद्याच्या वाढीमध्ये ग्रामीण भागाची खरेदीशक्ती हाच सर्वात मोठा घटक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महिंद्रासमूह आपल्या विविध उत्पादनांसह ग्रामीण भारताशी पूर्णपणे जुळला आहे. हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा यासाठी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पर्याय देण्याचा प्रयत्न महिंद्रा म्युच्युअल फंड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'महिंद्रा रुरल भारत अँड कन्झम्पशन योजना'
ग्रामीण भागातील ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांची पसंती असलेल्या उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळविण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून महिंद्रा म्युच्युअल फंड करणार असल्याचे बिष्णोई यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सक्षम आणि प्रसिद्ध कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे.
योजनेचा एनएफओ 19 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीसाठी खुला असून कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतणवूक करणे बंधनकारक आहे.