आजच्या परिस्थितीत गृहकर्जे ही तुलनेने सर्वात स्वस्त आहेत. स्थिरावलेले बांधकाम क्षेत्र आणि नोटबंदीनंतर बँकेत जमा झालेला पैसे यांमुळे घर खरेदीला चालना देण्यासाठी बँका स्वस्त दरात 'होम लोन' देऊ करत आहेत. स्टेट बँक, एचडीएफसी बँक ९ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. असे असले तरी, ज्या बँक किंवा वित्तसंस्थेकडून गृहकर्ज घेतलं आहे, त्या संस्थेकडे गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्याची मागणी करा. अनेक बँका कर्जदाराकडून मागणी झाल्यावर त्यास प्रतिसाद देऊन व्याजदर कमी करतात. परिणामी दुसऱ्या बँकेकडे गृहकर्ज हस्तांतरित न करताही कमी व्याजदराचा फायदा तुम्हाला मिळू शकेल.
गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्यावर त्याचा फायदा घेऊन घराचं स्वप्न साकारण्यासाठी मध्यमवर्गीय माणसं प्रयत्नशील असतात. गृहकर्जाचा व्याजदर कमी झाल्यावर प्रत्यक्षात किती फायदा होऊ शकतो आणि भविष्यातले व्याजदर काय असतील, याचा आढावा घेऊन गृहकर्जाबाबत निर्णय घेतला तर तो जास्त योग्य ठरू शकतो.
या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात काय आहेत सध्याचे गृहकर्ज व्याजदर (फ्लोटिंग) :
सार्वजनिक बँक खासगी बँक
बँकेचे नाव व्याजदर बँकेचे नाव व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया 8.30% - 8.65% आयसीआयसीआय बँक 8.75% - 8.95%
बँक ऑफ बडोदा 8.30% - 9.35% एचडीएफसी बँक 8.70% - 8.85%
महाराष्ट्र बँक 8.70% - 8.80% ऍक्सिस बँक 8.35% - 11.75%
कॅनरा बँक 8.35% - 8.55% इंडियाबुल्स 8.55% - 10.75%
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 8.30% कोटक महिंद्रा बँक 8.50%
देना बँकेत 8.25% - 8.35% येस बँक 9.35% - 10.50%
आयडीबीआय बँक लि. 8.35% - 8.65% पीएनबी हौसिंग फायनान्स 8.99% - 9.75%
इंडियन ओव्हरसीज बँक 8.55% - 9.05% सिटीबँक 8.60 % -10.50 %
युनियन बँक ऑफ इंडिया 8.60 सुंदरम बीएनपी पारिबास 8.75% - 9.45%
(प्रोसेसिंग शुल्क बँकेवर वेगळे घेतले जाते)