टाटा समूहातील आघाडीची कंपनी, टाटा पॉवरने नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या माध्यमातून 1,500 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. टाटा पॉवरने अनसेक्युअर्ड, नॉन क्युम्युलेटिव्ह, रिडिमेबल, करपात्र, नोदंणी झालेले, रेटिंग असलेले एनसीडी बाजारात आणले आहेत. 'कंपनीने 21 नोव्हेंबर 2019 ला 15,000 एनसीडी बाजारात आणले असून त्याचे मूल्य 1,500 कोटी रुपये आहे', अशी माहिती टाटा पॉवरने मुंबई शेअर बाजाराला सादर केलेल्या कागदपत्रात दिली आहे.
टाटा पॉवरच्या एनसीडी सीएआरई म्हणजेच केअरने 'एए' रेटिंग दिले आहे. त्याशिवाय 14 नोव्हेंबरला कंपनीने आणखी 1,000 एनसीडी बाजारात आणले आहेत. यातून टाटा पॉवरने 220 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा पॉवरचा शेअर 55.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे.