पुणे : डासांमुळे डेंग्यु आणि मलेरियासारख्या रोगांचा प्रसार होतो आणि भारतात दरवर्षी अनेकांना या आजारांची लागण होते. 2018 मध्ये देशभरात 89,974 हून अधिक जणांना डेंग्यु झाला, ज्यामध्ये 144 जणांचा मृत्यूही झाला. यंदा, डासांमुळे पसरणाऱ्या या आजाराने आतापर्यंत सहा बळी घेतले आहेत आणि 6,210 रुग्ण यंदा आढळले आहेत अशी माहिती सरकारने 21 जून, 2019 रोजी लोकसभेत दिली.
डेंग्युच्या उपचारांवर बराच खर्च होऊ शकतो. विशेषत:, रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल तर बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. त्यामुळे, या आजाराच्या खर्चांचा बोजा पडू नये म्हणून आर्थिक तजवीज करणे आवश्यक आहे. बजाज फिनसर्व्ह सादर करत आहेत परवडणाऱ्या दरात डेंग्यु कवर (Dengue Cover) फक्त 299 रु. वार्षिक हप्ता भरून आणि यातून तुम्हाला मिळेल 50,000 रुपयांपर्यंतचे कव्हरेज. या डेंग्यु विमा योजनेतून तुम्हाला मिळणारे फायदे :
निदान आणि हॉस्पिटलमधील खर्चाची तजवीज –
डेंग्यु झालेल्या रुग्णाला साधारणपणे 104 अंश फे. असा बराच ताप येतो. शिवाय, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागच्या बाजूला वेदना, अंगावर चट्टे येणे तसेच स्नायू आणि सांध्यांचे दुखणे असेही त्रास होतात. ही लक्षणे तशी ठराविक नसतात मात्र निदान करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. ही लक्षणे आठवडाभरापेक्षा अधिक काळ असतील तर डेंग्यु सीरॉलॉजी चाचणी केली जाते.
बजाज फिनसर्व्हच्या डेंग्यु कवर (Dengue Cover) मध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच्या किंवा हॉस्पिटलमधील निदान चाचण्या, वैद्यकीय खर्च आणि इतर अनेक खर्च मिळतात.
डॉक्टरांची फी आणि हॉस्पिटलच्या खोलीचे भाडे
डेंग्यु इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीची, हॉस्पिटलमधील आणि नंतरची डॉक्टरांची फी समाविष्ट आहे. आजारातून बरे होण्याच्या संपूर्ण काळात तुम्हाला बऱ्याचदा डॉक्टरांकडे बाह्य विभाग रुग्णात जावे लागते. त्यामुळे, हा एक मोठा लाभ तुम्हाला या योजनेत मिळतो. शिवाय, हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास सामान्य रूमसाठी दररोज 1,000 रुपयांपर्यंत भाडे आणि आयसीयूमध्ये असाल तर 2,000 रुपयांपर्यंतचे भाडे यात दिले जाते.
प्री आणि पोस्ट मेडिकेशनचा खर्च भरा अगदी सहज
डासांपासून होणाऱ्या या आजारासाठी काही ठराविक अशी उपचारपद्धती नाही. मात्र, तातडीने वैद्यकीय उपचार केल्यास दुर्देवी घटना टाळता येतात. काही रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण फारच कमी झाल्याने त्यांना रक्त चढवण्याची गरज भासू शकते. डेंग्युसाठीच्या या आरोग्य विम्यामध्ये तुम्ही उपचारांचा खर्च आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा खर्च अगदी सहज करू शकता. ही औषधे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी नंतर किंवा त्या वास्तव्यात खरेदी केलेली असू शकतात.
शिवाय, डेंग्यु विमा योजनेत 15 दिवसांपर्यंत, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधीचे आणि नंतरचे इतर काही पुरक खर्चही समाविष्ट आहेत.
भारतासारख्या देशात उष्णकटिबंधीय वातावरणामुळे दरवर्षीच डेंग्यु आजाराचा फैलाव होतो. यापासून संरक्षण करण्यासाठी बजाज फिनसर्व्हच्या 365 दिवस Dengue Coverचा लाभ घ्या फक्त 299 रुपयांत. यासाठी विविध पेमेंट पर्यायांतून तात्काळ प्रीमिअम भरता येईल.विम्याचा दावा करण्यासाठी तुम्ही फक्त आमला एक ईमेल करायचा आहे किंवा पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन करायचा आहे.