संतोष अगरवाल - Policybazaar.com चे सहयोगी संचालक आणि लाईफ इन्श्युरन्स विभागाचे क्लस्टर प्रमुख
"स्मार्ट व्हा आणि तुमच्या सर्व दायित्वांच्या एकूण रकमेपेक्षा अधिक आणि तुमच्या पश्चातही तुमच्या कुटुंबियांना तीच जीवनशैली कायम ठेवण्यासाठी पुरेशी ठरणारी रक्कम देणारी आयुर्विमा योजना निवडा"
कोणत्याही प्रकारच्या अनुचित परिस्थितीत तुमचे आणि तुमच्या मौल्यवान चीजवस्तूंचे संरक्षण करण्यासाठी विमा योजना हे सर्वात विश्वासार्ह आणि भरवशाचे साधन आहे, याबद्दल कोणतेही दुमत नाही. असे असले तरी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी आयुर्विमा किती असावा याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आयुर्विमा पॉलिसी असणे महत्त्वाचे आहेच, त्याचबरोबर विम्याची रक्कम पुरेशी असणेही तितकेच आवश्यक आहे. तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा विचार करून तुम्ही तुमची वैयक्तिक आयुर्विमा पॉलिसी किती रकमेची असावी याचा हिशेब करणे महत्त्वाचे आहे.
1 कोटीची आयुर्विमा पॉलिसी पुरेशी आहे का?
विमा पॉलिसी घेणाऱ्यांसाठी जीवन विम्याची रक्कम रु. 1 कोटी असेल, तर ती प्रचंड समजली जाते आणि ती सर्व खर्च भागविण्यास पुरेशी आहे, असाही समज असल्याचे दिसून आले आहे. पॉलिसीधारकाबाबत काही अनुचित प्रसंग घडल्यास कुटुंबाच्या गरजा व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही रक्कम पुरेशी आहे, असे त्यांना वाटत असते. अनेकांसाठी 1 कोटी हा आकडा सुयोग्य आहे आणि या रकमेची पॉलिसी घेण्याबाबत ते समाधानी असतात. याच ठिकाणी आवश्यक कार्यकारणभाव आणि मूलभूत गणित समजून घेण्यात ते चुकतात. किंबहुना अशा प्रकारच्या रँडम आकड्यावर किंवा ठोकळेबाज गृहितकांवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आठ आकडी रकमेची पॉलिसी ही मोठी भासू शकते आणि 1 कोटी रुपये बँकेत जमा केले तर 7% व्याज दर गृहीत धरता दर महिन्याला रु. 58,333 एवढे उत्पन्न मिळू शकते ही खरी गोष्ट आहे. ही रक्कम एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी पुरेशी आहे, असे वाटते.
पण या नाण्याची दुसरी बाजूसुद्धा आहे. कागदावर हा हिशेब अगदी परिपूर्ण वाटतो. पण जेव्हा अंमलबजावणीचा विचार केला जातो, तेव्हा हा हिशेब नाट्यमयरित्या बदलतो. पॉलिसीधारकावर असलेले कर्ज, वाढती महागाई आणि मुलांचे शिक्षण, लग्न आणि जोडीदाराच्या निवृत्तीनंतरच्या गरजा लक्षात घ्यायला बहुतेक जण विसरतात. त्यामुळे आयुर्विमा घेण्यापूर्वी अनेक प्रश्न विचारणे गरजेचे ठरते. पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्यांकडून ती रक्कम कशा प्रकारे वापरण्यात येणार आहे, तुमचे मासिक उत्पन्न बंद झाल्यामुळे तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना नियमित उत्पन्न कशा प्रकारे मिळेल आणि मुलांचे भविष्यातील खर्च आणि शिक्षण व लग्नाचा खर्च यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाईल, या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असते.
विमा पॉलिसीची रक्कम निश्चित करणे - गोंधळात टाकू शकणारा पण अत्यावश्यक निर्णय
या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार विम्याच्या पॉलिसीची रक्कम ही विमा पॉलिसी घेण्यास इच्छुक असलेल्या वयोगटावर अवलंबून असते. 40 वर्षे वयापर्यंतच्या नोकरदार व्यक्तीने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पटीने अधिक रकमेची विमा पॉलिसी घ्यावी. 40 वर्षापुढील आणि पन्नाशीच्या आतील व्यक्तीने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 10-20 पट रकमेची विमा पॉलिसी घ्यावी तर 50 पेक्षा जास्त वय असलेल्यांनी वार्षिक उत्पन्नाच्या 5 ते 10 पट रकमेची विमा पॉलिसी घ्यावी. वार्षिक उत्पन्नाप्रमाणेच कुटुंबाच्या वार्षिक खर्चाचे गणित मांडून त्यानुसार विमा पॉलिसीची रक्कम ठरवता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मतानुसार तुमचा टर्म इन्श्युरन्सची रक्कम कुटुंबाच्या वार्षिक खर्चाच्या 12-15 पट असावी. असे असले तरी आयुर्विमा पॉलिसीची निवड करताना 'एकच पॉलिसी सर्वांसाठी' हा दृष्टिकोन ठेवू नये आणि वैयक्तिक खर्च, दायित्व, गुंतवणूक आणि आवश्यकता यांचे सखोल विश्लेषण करणे हितावह असते.
तुमच्या जोडीदाराचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे
जेव्हा सर्वंकष आयुर्विमा योजनेचा विचार केला जातो तेव्हा जी योजना तुमच्या जोडीदाराच्या भविष्याची काळजी घेणाऱ्या योजनेची निवड करा. तुमच्या विमा योजनेने तुमच्या जोडीदाराच्या वृद्धापकाळातील गरजा भागविणे गरजेचे आहे, जेणेकरून ती/तो तुमच्या अनुपस्थितीत सन्मानाने आणि आरामात आयुष्य जगू शकेल. दैनंदिन खर्च, वैद्यकीय खर्च आणि मदतीशी संबंधित खर्चाचा विचार तुम्ही करावा. तुमच्यावर केवळ तुमची/तुमचा जोडीदार अवलंबून असेल तरच 1 कोटीची विमा पॉलिसी पुरेशी आहे, ज्यांना दोन किंवा अधिक मुले आहेत त्यांनी अधिक रकमेची विमा पॉलिसी घेणे हितावह ठरेल.
महागाईच्या वेगाशी जुळवून घेणे
तुमच्या कुटुंबाचा भविष्यातील खर्च लक्षात घेता महागाईचा वेग विसरून चालणार नाही. जसजसा काळ पुढे सरकेल तसतशा तुमच्या कुटुंबियांच्या आवश्यकता वाढतच जातील आणि तुमच्या कुटुंबाचा आजचा मासिक खर्च रु. 50,000 असेल तर भविष्यातील महागाईचा 7% दर लक्षात घेता पुढील पाच वर्षात हा खर्च 70,000 रुपये असेल. त्यामुळे तुम्ही आयुर्विमा पॉलिसी घेताना विम्याची एकूण रक्कम किती असेल याचा आपण का विचार केला पाहिजे यासाठी हे महत्त्वाचे कारण आहे. दर पाच वर्षांनी आणि विशेषतः लग्न, नवे घर विकत घेणे, मुलाचा जन्म इत्यादी महत्त्वाच्या प्रसंगी विमा संरक्षणाचा आढावा घेणे हितावह असते. ग्राहकांची मदत करण्यासाठी बहुतेक विमाकर्त्यांकडे विम्याची रक्कम वाढविणे किंवा लाईफ-स्टेज लिंक्ड एनहान्समेंट यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतात. या योजनांअंतर्घत तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये सुधारणा करू शकता आणि रक्कम वाढवू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबियांना अधिक चांगले आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकता.
धुम्रपान न करणाऱ्या वार्षिक 5 ते 7 लाख उत्पन्न असलेल्या 30 वर्षीय पुरुषासाठी रु. 2 कोटी इतकी विम्याची रक्कम असलेला 5 अग्रणी कंपन्यांच्या विमा पॉलिसीचे तुलनात्मक कोष्टक खाली देण्यात आले आहे
कंपनी योजनेचे नाव विमा वयोमर्यादा वार्षिक प्रीमियम (रु.)
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्श्युरन्स आयप्रोटेक्ट स्मार्ट 70 वर्षे 21,131
एचडीएफसी लाइफ इन्श्युरन्स ३डी प्लस लाइफ ऑप्शन 70 वर्षे 21,096
मॅक्स लाइफ इन्श्युरन्स ऑनलाईन टर्म प्लॅन प्लस 70 वर्षे 20,296
एगॉन लाइफ इन्श्युरन्स आयटर्म 70 वर्षे 15,451
पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्श्युरन्स कंपनी मेरा टर्म प्लॅन 70 वर्षे 17,370