विमा विक्री करताना विमा नियामक संस्था आयआरडीएच्या (IRDA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोलामंडलम जनरल इन्सुरन्सला IRDA ने 1.01 कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना आपल्याकडे वळविताना पोर्ट केलेल्या पॉलिसींवर कमिशन देणे आणि प्रीमियमवर सवलत देणे या प्रकारचा नियमांचे कंपनीने उल्लंघन केले आहे.
IRDA ने केलेल्या चौकशीत हेल्थ विमा योजनेचे पोर्टींग करताना कंपनीने विमा एजेंट्स आणि उपकंपन्यांना कमिशन दिल्याचे आढळून आले आहे. तर, काही जनरल योजनांमध्ये प्रीमियमवर तब्बल 55 टक्क्यांची सूट दिली गेली आहे.
आयआरडीएच्या नियमानुसार पोर्ट केलेल्या पॉलिसींवर कमिशन देणे गुन्हा आहे. कारण पोर्टींग करताना एजेंट्स किंवा तत्सम उपकंपन्यांचा काही संबंध नसतो त्यामुळे त्यांना कमिशन किंवा शुल्क देण्याची आवश्यकता नसते. मात्र या केस संदर्भात एजेंट्सला कमिशन दिल्याने त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचे IRDA च्या लक्षात आले.