जगभर, निर्देशांकाइतका परतावा देण्याचे उद्दिष्ट असणारे पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग हे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे कमी खर्चिक, पारदर्शक व वस्तुनिष्ठ साधन मानले जात आहे. एसपीआयव्हीए (एसअँडपी इंडिसेस व्हर्सेस क्टिव्ह फंड्स) स्कोअरकार्डने दर्शवल्याप्रमाणे, सातत्याने निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करणे हे जगभर अधिकाधिक अवघड ठरते आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. नव्या एसपीआयव्हीए इंडिया स्कोअरकार्डनेही दर्शवले आहे की, अगोदरच्या कॅलेंडर वर्षामध्ये 77% लार्ज-कॅप इक्विटी फंडांनी त्यांच्या संबंधित बेंचमार्क निर्देशांकापेक्षा कमी कामगिरी केली.
इक्विटी मार्केट म्हणजे झीरो सम गेम आहे, असे म्हटले जाते. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला नकारात्मक उत्पन्न मिळाले तर दुसऱ्या व्यक्तीला भरपूर उत्पन्न मिळते. तसेच, सक्रिय माध्यमांतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असताना काही वेळा त्या तुलनेतील पॅसिव्ह गुंतवणुकीपेक्षा अधिक महागडे ठरू शकते. भारतामध्ये सेबीने नियमनामध्ये नुकत्याच केलेल्या बदलांमुळे सक्रिय फंड मॅनेजरचे काम अधिक अवघड होण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये, म्युच्युअल फंडांचे निरनिराळ्या श्रेणींमध्ये विभाजन व टोटल रिटर्न इंडिसेसच्या मदतीने कामगिरीची तुलना, यांचा समावेश आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये भारतातील एक्स्चेंज ट्रेडेड फंड्ससाठीच्या (ईटीएफ) अॅसेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये (एयूएम) लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबर 2014 ते डिसेंबर 2019 या कालावधीत, एकूण एयूएममध्ये केवळ 2 अब्ज डॉलरवरून 14 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली.
इक्विटी ईटीएफ एयूएममध्ये लक्षणीय वाढ होण्यासाठी चालना देणारा प्रमुख घटक म्हणजे सरकारने राबवलेले उपक्रम. त्यातील एक उपक्रम म्हणजे, ईटीएफच्या माध्यमातून भारत सरकारची निर्गुंतवणूक. तसेच, 2015 मध्ये, एसअँडपी बीएसई सेन्सेक्स यासारख्या आघाडीच्या निर्देशांकांचा मागोवा घेणाऱ्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करण्याचा ईपीएफओचा (एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन) निर्णय हा ईटीएफ अॅसेट्सच्या लक्षणीय वाढीला चालना देणारा आणखी एक घटक होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने नुकत्याच केलेल्या सुधारणेद्वारे, ईपीएफओला आता आपल्या निधीतील 50% रक्कम एसअँडपी बीएसई सेन्सेक्समध्ये गुंतवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अलीकडेच, जानेवारी 2019 मध्ये सेबीनेही इक्विटी ट्रेडेड फंड्स व इंडेक्स फंड यांच्यासाठी पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन नियम जाहीर केले. अशा उत्पादनांतील पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशनशी संबंधित असलेल्या जोखमीवर उपाय करणे, हे या नियमांचे उद्दिष्ट होते.
फॅक्टर इन्व्हेस्टिंग व ईएसजी (एन्व्हॉयर्नमेंट, सोशल अँड गव्हर्नन्स) अशा नव्या संकल्पनाही जगभर आणि भारतात अतिशय लोकप्रिय होत आहेत. पोर्टफोलिओच्या जोखीम/परतावा या वैशिष्ट्यांचा स्रोत स्पष्ट करण्यास मदत करणारा घटक म्हणजे फॅक्टर असे म्हणता येऊ शकते. साधारणतः विचारात घेतले जाणारे फॅक्टर म्हणजे, आकार, तेजी-मंदी, गती, गुणवत्ता व मूल्य. एसअँडपी बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू, एसअँडपी बीएसई डिव्हिडंड यिल्ड, एसअँडपी बीएसई लो व्होलॅटिलिटी, एसअँडपी बीएसई मोमेंटम, एसअँडपी बीएसई क्वालिटी या निर्देशांकांची रचना त्यांच्या संबंधित फॅक्टर्सची कामगिरी मोजण्यासाठी करण्यात आली आहे. याचप्रमाणे, हवामानातील बदल, सामाजिक असंतोष व असमाधानकारक प्रशासन अशा धोक्यांमध्ये वाढ झाली की पर्यावरण, सामाजिक व प्रशासन या पैलूंचे पद्धतशीरपणे विश्लेषण केले जाते व गुंतवणूक विश्लेषणामध्ये त्यांचा विचार केला जातो. एसअँडपी बीएसई 100 ईएसजी इंडेक्स हे अशा प्रकारच्या निकषांच्या बाबतीत तुलनेने अधिक स्कोअर करणाऱ्या कंपन्यांच्या कामगिरीचे मापन करणाऱ्या ईएसजी इंडेक्सचे उत्तम उदाहरण आहे.
अजूनही गुंतवणुकीच्या नवनव्या संकल्पना आकार घेत आहेत. उदाहरणार्थ, रोबोटक्स, ऑटोमेशन व आर्टिफिशिअल इंटलिजन्स यामधील जलद घडामोडी, तसेच एकमेकाशी अत्यंत जोडलेपणा आणि प्रक्रियेची कमालीची क्षमता यामुळे आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत प्रचंड बदल घडू लागले आहेत. चौथी औद्योगिक क्रांती म्हटल्या जाणाऱ्या क्रांतीमध्ये आपण प्रवेश करत असताना, या क्रांतीला चालना देत असलेल्या कंपन्यांचा मागोवा एसअँडपी केन्शो न्यू इकॉनॉमी इंडिसेस: 21st सेंच्युरी सेक्टर्स℠ घेत आहे. पूर्णतः पद्धतशीर, नियमांवर आधारित पद्धतीचा वापर करून केन्शो न्यू इकॉनॉमी इंडिसेसची निर्मिती केलेली आहे. केन्शोच्या प्रोप्रायटरी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) प्लॅटफॉर्मचा लाभ घेत, प्रत्येक न्यू इकॉनॉमिक्समध्ये सहभागी असणाऱ्या कंपन्या ओळखण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणावरील नियमन व अन्य सार्वजनिक माहिती यांचे विश्लेषण करण्यात आले. यातील काही इंडिसेसमध्ये एसअँडपी केन्शो न्यू इकॉनॉमिक्स कम्पोझिट℠ इंडेक्स, एसअँडपी केन्शो क्लीन पॉवर इंडेक्स, एसअँडपी केन्शो स्पेस इंडेक्स, ड्रोन इंडेक्स, आणि एसअँडपी केन्शो इलेक्ट्रिक व्हेइकल्स इंडेक्स यांचा समावेश आहे.
ईटीएफ (ईटीएफ एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) म्हणजे काय?
ईटीएफ म्हणजे एखाद्या स्टॉकप्रमाणे ट्रेड करणारे फंड. हे फंड वापरण्यास सोपे आहेत आणि गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय आहेत. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स इंडेक्स अशा विशिष्ट निर्देशांकाच्या कामगिरीचा मागोवा घेणे, आणि गुंतवणूकदारांना कमी शुल्कामध्ये, त्या निर्देशांकाप्रमाणे जोखीम-परतावा देणे, हे ईटीएफचे उद्दिष्ट आहे.
ईटीएफच्या प्रमुख फायद्यांमध्ये समाविष्ट असलेले फायदे आहेत – वैविध्यीकरण, कमी खर्च, पारदर्शकता, सुलभ उपलब्धता व रोखता