डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएमने महाराष्ट्रातील पात्र असलेले ४ लाखांहून अधिक ऑफलाईन पार्टनर स्टोअर तसेच त्यांच्या कर्मचा-यांना जीवन विम्याची सुविधा देणार असल्याची घोषणा केली आहे. यात जीवन विमा कंपनीच्य वतीने विमा पॉलिसी देण्यात येणार असून त्याचा प्रिमियम पेटीएमच्या वतीने भरण्यात येईल. देशात कॅशलेस व्यवहाराचा प्रचार करण्याच्या व त्यास बळकटी देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला धरूनच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या स्टोअरमध्ये अनेक कर्मचारी सदस्यांकडे विमा सुविधा नाही. जीवन विमा सुविधेमुळे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवन सुरक्षित होईल. त्यांना नाममात्र रकमेच्या बदल्यात आपल्या कुटुंबियांना विमा संरक्षण देण्याचा तसेच विम्याची रक्कम वाढविण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
पेटीएमचे सीओओ किरण वासिरेड्डी यांनी सांगितले की, 'भारताला डिजिटल अर्थ व्यवस्थेचे व्हिजन समजावून देणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमची ऑफलाइन पार्टनर स्टोअर लोकांना डिजिटल पेमेंटमधील सोयी-सुविधांच्या बाबतीत लोकांना प्रशिक्षित करून आमचे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला मदत करत आहेत. आमचा हा दृढ विश्वास आहे की, महाराष्ट्रातील आमचे पार्टनर हे पेटीएम कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी, आम्ही त्यांना आणि त्यांच्या कर्मचा-यांना कॅशलेस जीवन विमा देऊ करत आहोत. या विम्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक सुरक्षा मिळेल आणि ते आमच्यासाठी जे काही करत आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.”