फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनीने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून विमा पॉलिसी उपलब्ध केली आहे. यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कंपनीला विमा उत्पादने सुरळीतपणे पोहचवता येणार आहेत.
व्हॉट्सऍपचा वापर कसा करावा याची माहिती प्रत्येकाला आहे. व्हॉट्सऍपसारख्या इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिसचा वापर विमा उद्योगक्षेत्राला नवीन आकार देण्याच्या क्षमतेने युक्त आहे, यामध्ये ग्राहक सहभागाची पातळीदेखील वाढली आहे. एफजीआयआयकरिता, तंत्रज्ञान-आधारित कार्यक्षम ग्राहक सेवेला मुख्य महत्त्व आहे आणि या सेवेचा शुभारंभ करणारी पहिली विमा पुरवठादार कंपनी असल्याचा अभिमान असल्याचे फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक के. जी. कृष्णमूर्ती राव यांनी सांगितले. व्हॉट्सऍपकडे विस्तारित स्वीकार्हता आहे आणि हे माध्यम संवादाचे प्राधान्य म्हणून बरेच पुढे गेले आहे. ग्राहकांना तातडीने पॉलिसी डॉक्युमेंटचा ऍक्सेस मिळणार असल्याने त्यांच्यासाठी सुविधाजनक ठरणार आहे. ज्या ग्राहकांना एफजीआयआयसोबत नवीन पॉलिसी खरेदी केली आहे किंवा नूतनीकरण केली असल्यास त्यांना तत्काळ व्हॉट्सऍपवर कन्फर्मेशन टेक्स्टसोबत मेसेज येईल आणि मेलही जाईल. त्याशिवाय प्रत्यक्ष पॉलिसीचे दस्तावेजही मिळतील, असे त्यांनी सांगितले.