मुंबई : रिटेलिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणार्या फ्युचर ग्रुप आणि जागतिक पातळीवरील अग्रगण्य विमा कंपनी असणार्या जनरालीचा सामान्य विमा विभाग फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी (एफजीआयआय)कडून सांभाळला जातो. एफजीआयआयने नुकतीच ग्राहकांना अधिक फायदेशीर ठरतील अशा वैशिष्ट्यांसह त्यांच्या ‘फ्युचर हेल्थ सुरक्षा’ प्रोडक्टची सुधारीत आवृत्ती सुरु केली आहे.
या विमा पॉलिसीचा लाभ 3 महिन्यांच्या बाळापासून 70 वर्षे वयाच्या वृध्द व्यक्तीलाही घेता येतो आणि आयुष्यभर पॉलिसीचे नुतनीकरण शक्य आहे. कोणीही 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीही दीर्घकालीन पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय निवडू शकतो. एकूण समवर आधारीत असणारे गोल्ड, प्लॅटिनम, पुष्कराज आणि रुबी असे 4 वेगवेगळे प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत. सम आधारीत पर्याय 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सर्व प्लॅन्स वैयक्तिक आणि फ्लोटर पर्यायासह आहेत. पोर्टेबिलिटी निर्देशांनुसार पोर्टेबिलिटीही उपलब्ध आहे.
फ्युचर हेल्थ सुरक्षाची प्रमुख वैशिष्ट्ये :
• प्रवेश वय - लाईफलाँग रिन्युअलसह 3 महिन्यांपासून 70 वर्षांपर्यंत.
• पॉलिसी कालावधी - प्रोडक्ट कमाल 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत उपलब्ध आहे.
• प्लॅन्स आणि सम इन्शुअर्ड पर्याय उपलब्ध
गोल्ड, प्लॅटिनम, पुष्कराज आणि रुबी असे 4 वेगवेगळे प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत. हे सर्व प्लॅन्स वैयक्तिक आणि फ्लोटर पर्यायांसह उपलब्ध असून 2 लाख आणि त्याहून अधिकच्या इन्शुअर्ड पर्यायांसह उपलब्ध आहेत.
• झोन ए, झोन बी आणि झोन सी अंतर्गत 50000, 100000, 150000च्या इन्शुअर्ड समसह 25 वर्षे वयाच्या मुलांपर्यंत नवीन व्यवसायासाठी लागू असेल.
• झोन सी अंतर्गत ग्रामीण विभागातील नवीन व्यवसायांसाठी 100000, 150000 पर्यंत इन्शुअर्ड सम लागू आहे.
• संचयी बोनस - इन्शुअर्ड समपैकी कमाल 50 टक्केपर्यंत प्रत्येक दावामुक्त वर्षासाठी 10 टक्के.
• डिस्काउंट -
• फॅमिली डिस्काउंट - वैयक्तिक इन्शुअर्ड सम पर्यायात कुटुंबातील दोन किंवा अधिक सदस्य कव्हर केले जात असल्यास लागू होईल.
• लाँग टर्म डिस्काउंट - एका वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या सिंगल प्रिमियम पेमेंटसाठी लागू
• लॉयल्टी डिस्काउंट - क्लायंटकडे आधीपासून फ्युचर जनराली लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची स्वतंत्र रिटेल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर त्याला लायल्टी डिस्काउंटचा लाभ मिळतो. (फ्युचर हेल्थ सुरक्षा/वैयक्तिक अपघात/प्रवास)
• पोर्टेबिलिटी - पोर्टेबिलिटी निर्देशांनुसार पोर्टेबिलिटीही उपलब्ध आहे.
• पेमेंट पर्याय - दीर्घकालीन पॉलिसीजसाठी हप्ता आधारीत प्रिमियम भरण्याचा पर्यात. झोननिहाय श्रेणीबध्द केलेल्या शहरांनुसार प्रिमियमची रक्कम भिन्न असू शकेल.
प्रमुख फायदे
• इनपेशंट हॉस्पिटलायजेशन
• डे केअर उपचार खर्च
• प्रि हॉस्पिटलायजेशन वैद्यकीय खर्च
• पोस्ट हॉस्पिटलायजेशन वैद्यकीय खर्च
• रुग्णवाहिका शुल्क
• मोफत वैद्यकीय तपासणी
• रुग्ण शुश्रुषा
• अपघात हॉस्पिटलायजेशन
• हॉस्पिटल कॅश
• सोबतची व्यक्ती
• अवयवदात्याचा खर्च
• तात्काळ रुग्णवाहिका
• संचयीत बोनस
• इन्शुअर्ड समचा रिचार्ज