म्युच्युअल फंड एनएव्ही मोजताना चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक ऑफ इंडिया अॅक्सा म्युच्युअल फंडाने वितरक आणि गुंतवणूकदारांना संपर्क साधून संबंधित रकमेची भरपाई लवकरच देणार असल्याचे सांगितले आहे.
म्युच्युअल फंड कंपनीने 26 जून, 2019 रोजी अधिसूचित केल्यानुसार, सिनटेक्स बीएपीएल लिमिटेडचे पत रेटिंग कमी झाल्यानंतर कंपनीला बॉण्डच्या माध्यमातून दिलेली रक्कम 'राईट ऑफ' केली होती. मात्र चुकीने राइट ऑफ रक्कम जास्त दाखविण्यात आली होती. त्यामुळे त्याचा परिणाम एनएव्ही मूल्यावर झाला होता. त्यामुळे ताळेबंद पडताळणीत ही चूक लक्षात आल्यानंतर 26 जून, 2019 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंडात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे. या कालावधीत ज्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली आहे त्यांना देखील ही रक्कम देण्यात येईल.
याशिवाय ज्या गुंतवणूकदारांना एनएव्ही च्या फरकामुळे कमी युनिट्स मिळाले आहेत त्यांच्या खात्यात अतिरिक्त युनिट्स जमा करण्यात येतील.