कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमी वर ठप्प असलेल्या उदयोगांना पुर्नचालना देण्यासाठी आणि आपल्या ग्राहकां साठी बँक ऑफ इंडिया ने विशेष कर्ज योजना अतिशय व्यापक व्याज दरात उपलब्ध केल्या आहेत.बैंक ऑफ इंडिया च्या पुणे विगातर्फे सर्व शाखाप्रमुख आणि ग्राहकांना सर्व योजनांचा लाभण्यासाठी वेबीनार द्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बैंक ऑफ इंडियाच्या एनबीजी पश्चिम-२ चे महाप्रबंधक श्री. रमेशचंद्र ठाकुर, पुणे विभागीय व्यवस्थापक श्री.राजेश इंगळे व उप विभागीय व्यवस्थापक श्री. सदाशिव कुलकर्णी यांनी सदर वेबीनार द्वारे केले.
सदर योजनांची वैशिष्ठे खालीलप्रमाणे :
कोविड तत्काल सहाय्य योजना: व्यवसायासाठी घेतलेल्या नियमित कॅश क्रेडिट कर्ज स्वीकृत राशिच्या १० टक्के पर्यायी रक्कम ६.८५ टक्के व्याज दराने कर्ज म्हणून आपल्या ग्राहकाना उपलब्ध करून देत आहे.सदर कर्जाची परतफेड ६ महिन्यानंतर १८ मासिक हफ्त्यामधे करावयाची आहे.
स्टार जीईसीएल कर्ज योजना: बँकेचे सर्व नियमित व्यावसाईक कर्जदार ज्यांचे खेळते भांडवल १०० करोड पेक्षा कमी व स्वीकृत फंड बेस लिमीट २५ करोड रूपए पेक्षा कमी असलेल्या कर्जधारकांना त्यांच्या स्वीकृत राशिच्या २० टक्के पर्यायी रक्कम माफक व्याजदरात उपलब्ध.
कोविड-१९ वैयक्तिक कर्ज योजना : सर्व नियमित गृहकर्ज , व्यक्तिगत कर्ज आणि पगारदार नोकर वर्ग खातेदारांसाठी ५ लाख रूपए पर्यंतचे वैयक्तिक कर्ज ६.८५ टक्के व्याज दराने उपलब्ध
कोविड -१९ पेन्शनर कर्ज योजना : बँक ऑफ इंडिया च्या सर्व पेन्शनर खातेधारका साठी २ लाख रूपए पर्यंतची पेन्शनर कर्ज योजना ६.८५ टक्के व्याज दराने उपलब्ध.
कोविड किसान तत्काळ कर्ज योजना : सर्व नियमित पिककर्ज धारक शेतक-यांना पीककर्जाच्या ५० टक्के , अधिकतम ५०,००० रूपए पर्यंतचे तत्काळ कर्ज उपलब्ध.
कोविड सामान्य क्रेडिट कार्ड : नियमित कर्ज खाते असणा-या बचत गटाच्या सदस्यांसाठी रूपए ५,००० चे वैयक्तिक कर्ज उपलब्ध.