बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स मध्ये नव्याने दाखल केलेल्या अत्याधुनिक युलिप बजाज अॅलियान्झ लाइफ गोल अॅश्युअरमुळे ऑनलाइन युलिप क्षेत्रात कंपनीने आघाडी घेतली आहे. या उत्पादनामध्ये आरओएमसी (रिटर्न ऑफ मॉरटॅलिटी चार्जेस) हे खास वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेमुळे केवळ सात महिन्यांमध्ये आधुनिक युलिपने वार्षिक 120 कोटींचा प्रीमिअम नोंदवला आहे आणि या कालावधीत अंदाजे 12,000 योजनांची विक्री केली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे 1200 योजनांची विक्री झाली आहे. त्यानंतर कर्नाटक व आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. तरुण वर्गावर अधिक भर देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम झाल्याचे दिसून येते, कारण बहुतेकसे योजनाधारक (55%) 26-35 वर्षे वयोगटातील आहेत.
याविषयी बोलताना बजाज अॅलियान्झ लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ यांनी सांगितले, “आमच्या आरओएमसी-एनेबल्ड, जीवनातील उद्दिष्टांवर भर देणाऱ्या पहिल्या उत्पादनाला मिळालेला प्रतिसाद अतिशय समाधानकारक आहे. यामुळे आम्हाला नवनवी उत्पादने निर्माण करण्यासाठी, तसेच या उद्योगात खास उत्पादने उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे. आयुष्यातील उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यास मदत करतली, अशी गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांमध्ये हे उत्पादन यापुढेही लोकप्रिय राहणार आहे.”
बजाज अॅलियान्झ लाइफ गोल अॅश्युअरमध्ये आरओएमसी बरोबरच फंड व्यवस्थापनाचे कमी शुल्क व रिटर्न एन्हान्सर ही वैशिष्ट्ये आहेत. प्रामुख्याने आरओएमसी वैशिष्ट्यामुळे योजनाधारकाला मुदतपूर्तीच्या वेळी जीवनकवचाचा खर्च परत मिळेल, याची हमी मिळते व त्यामुळे मुदतपूर्तीच्या वेळी निधीचे मूल्य वाढते.