बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील एका आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 24% वाढ साध्य करून इंडिव्हिज्युअल रेटेड न्यू बिझनेस प्रीमिअमध्ये उत्तम प्रगती करण्याच्या बाबतीत सातत्य राखले आहे. तिमाहीदरम्यान, इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये पारंपरिक व्यवसायाचा हिस्सा 39% होता, तर या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत 28% होता.
या कंपनीने या उद्योगाच्या तुलनेत वेगाने वाढ साध्य केली असून, इंडिव्हिज्युअल रेटेड न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 12.7% वाढ झाली, तर या उद्योगाने 9.9% वाढ नोंदवली, तसेच कंपनीने आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या सहामाहीत 11.4% वाढ झाली. आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत, कंपनीची सरासरी रक्कम 54,636 रुपये होते, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत 39,895 रुपये होती, त्यात 37% वाढ झाली.
प्रगतीविषयी बोलताना, बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही ग्राहकांना त्यांच्या जीवनातील उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने लक्षणीय गुंतवणूक केली आहे. यासाठी आम्ही योग्य वेळेमध्ये नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा दाखल केल्या. तिमाहीमध्ये आम्ही नोंदवलेल्या आकडेवारीतून, या उपक्रमांना मिळालेले यश स्पष्ट होते. नावीन्याचा समावेश केल्याने आमचे बाजारातील स्थान सक्षम होण्यासाठी हातभार लागेल, असा विश्वास आहे. तसेच, आमच्या आयुर्विमा उत्पादनांमुळे अनेक भारतीयांना त्यांची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मदत होईल.”
कंपनीने ऑनलाइन युलिप क्षेत्रामध्ये आघाडीचे स्थान मिळवले. कंपनीच्या अत्याधुनिक ऑनलाइन युलिप असलेल्या बजाज अॅलियान्झ लाइफ गोल अॅश्युअरमधील रिटर्न ऑफ मॉरटॅलिटी चार्ज (आरओएमसी) या वैशिष्ट्यामुळे कंपनीला दाखल केल्यापासून नऊ महिन्यांमध्ये 16,000 हून अधिक योजना देण्यासाठी व 146 कोटी रुपयांहून अधिक प्रीमिअम मिळवण्यासाठी मदत झाली. बजाज अॅलियान्झ लाइफ गोल अॅश्युअर फेब्रुवारी 2018 मध्ये सादर झाले.
बजाज अॅलियान्झ लाइफने रेटेड इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत 346 कोटी रुपयांपर्यंत वाढ साध्य केली, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 280 कोटी रुपये होते. रिन्युअल प्रीमिअमच्या बाबतीत, कंपनीने आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत 17% म्हणजे 870 कोटी रुपयांपर्यंत वाढ साध्य केली, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 744 कोटी रुपये होते. बजाज अॅलियान्झ लाइफचा ग्रॉस रिटन प्रीमिअम आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत 2,083 कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत 2,015 कोटी रुपये होता.