बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने 31 मार्च 2018 पर्यंत योजना सुरू असलेल्या योजनाधारकांसाठी वन-टाइम विशेष बोनस देण्याची घोषणा केली आहे. संबंधित योजनेसाठी जाहीर करण्यात आलेल्या कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनसच्या व्यतिरिक्त हा वन-टाइम विशेष बोनस दिला जाणार आहे. गुंतवणूक कायम ठेवलेल्या व कंपनीवर विश्वास असलेल्या अंदाजे 13 लाख योजनाधारकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
वन-टाइम विशेष बोनस केवळ आर्थिक वर्ष 2017-18 साठी, दाव्याच्या वेळी देय असलेल्या सम अॅश्युअर्डच्या 1% असेल. वन-टाइम विशेष बोनसबरोबरच, बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने वार्षिक कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनसही जाहीर केला आहे. कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनस सम अॅश्युअर्डच्या व सर्व संचित बोनसच्या अनुषंगाने मोजला जातो.
योजनाधारकांसाठीच्या वन-टाइम विशेष बोनसविषयी बोलताना बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, “आमच्या कंपनीला भांडवली नफा झाला आहे व त्याचा लाभ योजना सुरू असलेल्या योजनाधारकांनाही देण्याचे आम्ही ठरवले आहे. वार्षिक बोनसव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या वन-टाइम विशेष बोनसमुळे आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबरची गुंतवणूक कायम ठेवल्याचा फायदा मिळेल व त्यांची जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत होईल”.
बोनसचा परिणाम
बोनसचा परिणाम समजून घेण्यासाठी, ग्राहकाने 20 वर्षे कालावधी असलेली, 20,00,000 रुपये सम अॅश्युअर्ड असलेली बजाज अॅलियान्झ एलिट ही योजना गेल्या वर्षी खरेदी केली, असे गृहित धरू. या आर्थिक वर्षात, 4.5% कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनस जाहीर केला असून त्याची रक्कम 90,000 रुपये आहे. याबरोबरच, बेस सम अॅश्युअर्डच्या 1% विशेष बोनसही जाहीर करण्यात आला आहे. ग्राहकासाठी ही रक्कम 20,000 वन-टाइम विशेष बोनस इतकी असेल.