मुंबई: एनबीएफसी कंपनी असलेल्या बजाज फायनान्स आणि खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आरबीएल बँक सुपरकार्डच्या निमित्ताने एकत्र येत दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी दहा लाखांचा ग्राहक गाठला आहे. हा मैलाचा टप्पा गाठणारे हे भारतातील पहिले को-ब्रँडेड क्रेडीट कार्ड ठरले आहे.
फेब्रुवारी 2017 मध्ये बजाज फिनसर्व आरबीएल बँक सुपरकार्ड बाजारात दाखल करण्यात आले होते. हे कार्ड बजाज फिनसर्वच्या 60 हून अधिक शहरांमध्ये असलेल्या चालू आणि नवीन ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले. या सुपरकार्डमध्ये बजाज फिनसर्वच्या विक्रेत्यांच्या ऑफर्सचा समावेश असून ग्राहकोपयोगी उपकरणे, मोबाईल, किराणा सामान आणि कपड्यांशी संबंधित 80 हजारांहून अधिक विक्रेत्यांच्या साथीने आरबीएल बँकेचा सर्वोत्तम कार्ड व्यवस्थापन अनुभव ग्राहकांना घेता येतो. ही कामगिरी अतिविशेष ठरते कारण सुपर कार्डच्या 1 दशलक्ष कार्डधारकांपैकी 40% हून अधिक ग्राहक पहिल्यांदाच क्रेडीट कार्डचा वापर करणारे आहेत. त्यामुळे डिजीटल पेमेंट उपक्रमात वित्तीय सहभाग वाढाण्यासही हातभार लागला.
या कामगिरीविषयी बोलताना बजाज फायनान्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह वाईस प्रेसिडेंट (पेमेंट्स) मनीष जैन म्हणाले की, “आमच्या ग्राहकांनी आमच्यावर सातत्याने जो विश्वास दाखवला, जो पाठींबा दिला त्यामुळेच 1 दशलक्ष ग्राहक टप्पा गाठणे शक्य झाले. आमची सुलभ तंत्रज्ञान-आधारीत संपादन प्रक्रिया आणि अभिनव स्वरुपाची नव-कल्पनायुक्त उत्पादनांमुळे डिजीटल पेमेंट परिवर्तनाला मदत मिळाली आणि ग्राहक अनुभव वृद्धिंगत होण्यास मदत झाली. आमच्या मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या कस्टमर फ्रेंचायजी 32 दशलक्षहून अधिक आहेत, मोठ्या प्रमाणावर सुस्थिर क्रेडीट कार्ड फ्रेंचायजी उभारण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. ज्यामुळे भारतातील अस्थिर डिजीटल पेमेंट व्यवस्थेत बदल होतील”
हरजीत तूर (हेड - रिटेल, फायनान्शियल इन्क्लूजन अँड रुरल बिझनेस) म्हणाले की, “आमच्या ग्राहकांना योग्य मूल्य आणि सुलभता उपलब्ध करून देण्यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्हाला मिळालेले एक दशलक्ष ग्राहकांचे पाठबळ ही आमच्या प्रयत्नांची पोचपावती समजतो. बजाज फिनसर्व हा एक उत्तम भागीदार आहे, आणि भविष्यात एकत्रितपणे ग्राहक अनुभव समृद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही प्रगत तंत्रज्ञान अंगीकारून दर्जेदार सेवा आणि उत्पादने उपल्ब्ध करून अधिकाधिक मैलाचे टप्पे गाठू ही आशा वाटते.”