गेल्या काही वर्षांत वैद्यकीय खर्च महागल्याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे आणि वैद्यकीय तातडीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आरोग्य विमा किती महत्त्वाची भूमिका निभावतो हेही कळू लागले आहे. भारतीय ग्राहकांना नेहमी आरोग्य विम्याची किंमत आणि पुरेसे संरक्षण याची काळजी वाटत असते. पण त्यांनी काळजी करायची गरज नाही, कारण आरोग्य विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नावीन्यता येत आहे. अनेक विमा कंपन्यांनी मल्टि-इंडिव्हिज्युअल योजना सादर केल्या आहेत. पण मल्टि-इंडिव्हिज्युअल आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी की संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देणारी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घ्यावी याबद्दल अजूनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. या दोन्ही योजना इंडेम्निटी (नुकसान भरपाई) देणाऱ्या योजना आहेत. म्हणजे या योजनांच्या अंतर्गत विम्याच्या रकमेपर्यंत हॉस्पिटलचा खर्चाची भरपाई मिळते किंवा कॅशलेस दाव्याला मंजुरी मिळते.
या दोन्ही प्रकारच्या योजनांचे लाभ आणि तोटे असल्यामुळे कोणत्या प्रकारची योजना विकत घ्यावी याचा निर्णय घेणे कठीण असते. उत्पन्न, प्रीमिअम देण्याची क्षमता, विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि रोजगाराचा प्रकार यावर हा निर्णय अवलंबून असतो. मल्टि इंडिव्हिज्युअल आरोग्य विमा पॉलिसी म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी निश्चित विमा रकमेचे संरक्षण मिळते. मल्टि-इंडिव्हिज्युअल आरोग्य विमा योजना प्रत्येक व्यक्तीच्या नावे घ्यावी लागते. यात पती, पत्नी, मुले आणि त्यांच्यावर अवलंबून पालक इत्यादींचा समावेश असतो. या योजनेमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेगळे विमा संरक्षण मिळते. त्याचबरोबर एकाच पॉलिसीमध्ये अनेकांचा विमा काढल्याने सवलतही उपलब्ध असते. विमा संरक्षण मिळालेल्या सदस्यांना ओपीडी आणि नो क्लेम बोनसही मिळतो. प्रिमीअमबद्दल सांगायचे झाल्यास ५ लाख + ५ लाख एवढ्या रकमेची मल्टि इंडिव्हिज्युअल विमा पॉलिसी ही १० लाख रकमेच्या फ्लोटर योजनेपेक्षा स्वस्त पडते.
या उलट, फॅमिली फ्लोटर योजनेअंतर्गत संपूर्ण विम्याची रक्कम पती, पत्नी, मुले आणि अवलंबून पालक यांच्यापैकी कुणीही वापरू शकतो. उदा. तुम्ही रु. १० लाख रकमेची फॅमिली फ्लोटर विमा पॉलिसी घेतली असेल तर कुटुंबातील कोणताही सदस्य पूर्ण रकमेचा वापर करू शकतो. फॅमिली फ्लोटर योजनेमध्ये एकूण विम्याच्या रकमेचा वापर करण्यासाठी लवचिकता प्राप्त होते. इथे असे वाटू शकेल की, २ किंवा अधिक सदस्यांचा विमा काढायचा असेल तर फॅमिली फ्लोटर योजना अधिक उपयुक्त ठरू शकते. पण वस्तुस्थिती अशी नाही.
मुद्दा असा आहे की, १० लाखांचे विमा संरक्षण हे सर्व सदस्यांसाठी असते. त्यामुळे एखादा सदस्य रुग्णालयात दाखल झाला आणि ५ लाख रुपये खर्च झाला तर इतर सर्व सदस्यांसाठी त्या वर्षासाठी मिळून ५ लाख रुपयांचीच रक्कम शिल्लक राहते. कुटुंबातील सर्वात थोरल्या सदस्याच्या वयानुसार फॅमिली फ्लोटर पॉलिसीच्या प्रीमिअमची रक्कम ठरत असते. त्यामुळे मुलांच्या विम्यासाठी दिला जाणारा प्रीमिअम हा पालकांच्या वयानुसार ठरत असतो. फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये कुटुंबातील सर्वात थोरल्या सदस्याच्या वयाचा विचार करून प्रीमिअम आकारला जातो.
अशा वेळी, मल्टि इंडिव्हिज्युअल आरोग्य विमा पॉलिसी घेणे हितावह ठरते. त्यामुळे अगदी दुर्मीळ परिस्थिती म्हणजे जलजन्य आजारामुळे संपूर्ण कुटुंबाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर प्रत्येकाला स्वतंत्रपणे विमा संरक्षण असते आणि एका सदस्याच्या विमा रकमेचा दुसऱ्या सदस्याच्या विमा संरक्षणाच्या रकमेवर काही परिणाम होत नाही.
- अमित छाब्रा
| परिस्थिती १ | परिस्थिती २ | परिस्थिती3 | | |
वय १ (पुरुष) | ३५ | ४५ | ५५ | | |
वय २ (स्त्री) | ३२ | ४२ | ५३ | | |
विम्याची रक्कम | १००००० | ५५०००० | ७५०००० | | |
फ्लोटर प्रीमिअम | १५,३०३ | १५,७९८ | २९,६३९ | | |
मल्टिइंडिव्हिज्युअलप्रीमिअम | १४,४६६ | १५,७४४ | २७,९८२ | | |
फरक (मल्टिइंडि. –फ्लोटर) | -८३६ | -५४ | -१,६५८ | लाभ १: |
% फरक | -५% | -०.३०% | -६% | मल्टिइंडिव्हिज्युअलसाठी कमी प्रीमिअम |
00