मोतीलाल ओस्वाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने चार नवीन इंडेक्स फंड बाजारात आणले आहेत. या चार इंडेक्स फंडची नावे पुढीलप्रमाणे आहेत,
1. मोतीलाल ओस्वाल मिडकॅप 150 इंडेक्स फंड
2. मोतीलाल ओस्वाल निफ्टी 500 इंडेक्स फंड
3. मोतीलाल ओस्वाल निफ्टी बॅंक इंडेक्स फंड
4. मोतीलाल ओस्वाल निफ्टी स्मॉल-कॅप 250 इंडेक्स फंड
या नव्या फंडाचा एनएफओ आज खुला होतो आहे आणि त्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट आहे. या फंडांचे व्यवस्थापन स्वप्नील मयेकर करणार आहेत.
मोतीलाल ओस्वाल निफ्टी 500 इंडेक्स फंड - या फंडाद्वारे निफ्टी 500 इंडेक्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा भारतातील पहिलाच निफ्टी 500 फंड आहे. त्याचबरोबर हा देशातील पहिला लो कॉस्ट मल्टी कॅप इंडेक्स फंड आहे. या फंडातील बहुतांश गुंतवणूक ही लार्ज कॅप कंपन्यांमध्येच केली जाणार आहे. तर जवळपास 20 टक्के गुंतवणूक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये केली जाणार आहे.
मोतीलाल ओस्वाल निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंड - या फंडाद्वारे निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्समधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. हा देशातील पहिला मिडकॅप 150 इंडेक्स फंड आहे.
मोतीलाल ओस्वाल निफ्टी बॅंक इंडेक्स फंड - या फंडाद्वारे निफ्टी बॅंक इंडेक्समधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. निफ्टी बॅंक इंडेक्समध्ये मोठ्या आणि तरल भारतीय बॅंकांचे शेअर असतात. हा देशातील पहिला निफ्टी बॅंक इंडेक्स फंड आहे.
मोतीलाल ओस्वाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड - या फंडाद्वारे निफ्टी स्मॉलकॅप 250 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. निफ्टी 250 इंडेक्समध्ये ज्या कंपन्यांची क्रमवारी 251 ते 500 आहे त्यांचा समावेश होतो. या इंडेक्सद्वारे स्मॉलकॅप कंपन्यांच्या बाजारमूल्याची मोजणी केली जाते. हा देशातील पहिला निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड आहे.