वास्तववादी आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे, हे यशस्वी गुंतवणुकीच्या दिशेने पहिले पाऊल असते. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करतील, असे गुंतवणुकीचे पर्याय समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तुमच्या दीर्घकालीन किंवा अल्पकालीन गुंतवणूक उद्दिष्टासाठी म्युच्युअल फंड आदर्श ठरू शकतात, पण एखाद्याच्या योजनेचे यश कोणत्या प्रकारचा फंड निवडला जातो, यावर आधारित असते. असे असल्याने, यूटीआय इक्विटी फंड ही सर्व लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करणारी व 7,896 कोटी रुपये निधी असलेली व crores and trusted by over 11.42 लाख गुंतवणूकदार असलेली (जून 30, 2018 पर्यंत) ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराला मूलभूत इक्विटी गुंतवणुकीसाठी आदर्श ठरेल, अशी ही यूटीआय म्युच्युअल फंडाची योजना आहे.
गुणवत्ता, वाढ व मूल्यांकन या प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट, यामुळे यूटीआय इक्विटी फंड अन्य फंडांपेक्षा वेगळा ठरतो. दीर्घकालावधीमध्ये उत्तम वाढ साधण्याची क्षमता असलेल्या व अनुभवी व्यवस्थापनातर्फे चालवल्या जात असलेल्या अत्यंत दर्जेदार व्यवसायांवर भर देण्याचे पोर्टफोलिओचे धोरण असेल.
“गुणवत्ता” हे दीर्घ कालावधीमध्ये उच्च रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (RoCE) किंवा रिटर्न ऑन इक्विटी (RoE) यामध्ये सातत्य ठेवण्याची व्यवसायाची क्षमता स्पष्ट होते. आपल्या उद्योगाच्या किंवा क्षेत्राच्या कठीण काळातही उच्च RoCEs व RoEs नोंदवण्याची क्षमता असणे आणि त्यामुळे नेहमी भांडवलाच्या खर्चापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करणे, हे खऱ्या अर्थाने दर्जेदार व्यवसायांचे वैशिष्ट्य असते. उच्च RoCE/ RoE असलेल्या कंपन्यांना सक्षम कॅश-फ्लो नोंदवता येतो व त्यामुळे आर्थिक मूल्य निर्माण करता येते.
“वाढ” व्यवसायासाठी दीर्घकालीन सुरक्षित वाढ दर्शवते. सायक्लिकल व अंदाज वर्तवता न येण्यासारखी वाढ असण्याऐवजी स्थिर व अंदाज वर्तवता येण्यासारखी वाढ असलेल्या व्यवसायांवर भर दिला जातो. वाढीला चालना देणारे दीर्घकालीन घटक व त्याचे भविष्यातील परिणाम समजून घेण्यात तुलनेने निश्चितता असेल अशा अंदाज वर्तवण्यायोग्य वाढीला पसंती देण्याचे प्राधान्य विचारात घेता, सायक्लिकल वाढ किंवा नकारात्मक वाढ तीव्र व अंदाज वर्तवता न येण्यासारखी असू शकते आणि गुंतवणुकांना आश्चर्याचा चांगला किंवा वाईट धक्का बसू शकतो. उत्तम गुणवत्ता असलेले व्यवसाय आर्थिक मूल्य तयार करतात, तर उच्च वाढ साधणारे व्यवसाय हे आर्थिक मूल्य वाढवतात. यामुळेच, या फंडातर्फे स्टॉकची निवड करताना गुणवत्ता व वाढ यांची सांगड घातली जाते.
अंतिम मुद्दा म्हणजे, हा फंड योग्य “मूल्यांकन” असलेले स्टॉक खरेदी करण्यावर भर देतात. व्यवसाय संपूर्ण कालावधीमध्ये किती कॅश-फ्लो निर्माण करतात त्याचे मूल्य विचारात घेऊन व आजच्या तारखेने त्यांचे पुन्हा डिस्काउंटिंग करून स्टॉकचे मूल्य ठरवता येऊ शकते. जे व्यवसाय जितक्या रोख रकमेचा वापर करतात त्यापेक्षा जास्त निर्माण करतात, म्हणजे फ्री कॅश फ्लो हा आर्थिक मूल्याचा व शेवटी भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचा स्रोत असतो. कॅशफ्लोवर भर दिल्यास, विजेते व मल्टिबॅगर्स निवडत असताना थोडी सुरक्षितता राखली जाते.
हा फंड “वाढ”या पद्धतीची गुंतवणूक करून, संपूर्ण मार्केट कॅपिटलायझेशन क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. इक्विटी हा गुंतवणुकीचा मूलभूत घटक असण्याची इच्छा असलेल्या, तसेच आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल उभारण्यासाठी उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी यूटीआय इक्विटी फंड साजेसा आहे.