गुंतवणूकीची विभागणी म्हणजे विविध प्रकारच्या मालमत्तेतील गुंतवणूकीचे एकप्रकारे मिश्रण होय. शेअर, डेट, सोने हे गुंतवणुक विभागणीची काही उदाहरणे होत. विविध वित्तीय उद्दीष्टे त्याचबरोबर जोखीम पेलण्याची क्षमता विचार घेत जोखीम आणि परतावा यांच्यात योग्य संतुलन साधत साधणे हे गुंतवणूक विभागणीचे उद्दीष्ट होय. दुर्दैवाने बहुतांश गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक विभागणीला फारसे महत्व दिले जात नाही. परिणामी अनेक गुंतवणूकदारांची गुंतवणूक ही विशिष्ट मालमत्तेकडे अधिक झुकलेली दिसते आणि त्यात जोखीम व्यवस्थापन आणि परतावा याचा काहीही विचार केलेला नसतो.
विविध प्रकारच्या गुंतवणूकीत विविध प्रकारची जोखीम असते. जोखीम आणि परतावा यांचा तर थेट संबंध असतो. जोखीम ही दुहेरी तलवारीसमान असते. जर तुम्ही अल्प जोखीम घेतली तर तुमचे आर्थिक उद्दीष्ट गाठण्यासाठी आवश्यक असलेला पैसा तुम्हाला मिळू शकत नाही. उलटपक्षी जर तुम्ही अधिक जोखीम उचलली तर तुमचे आर्थिक उद्दीष्ट हे शेअरबाजारातील अनिश्चिततेशी गुंफले जाऊ शकते. त्यामुळे योग्य प्रकारे गुंतवणूकीच्या विभागणीमुळे तुम्ही इष्टतम जोखीम घेत अल्प, मध्यम आणि दीर्घ कालावधीतील आर्थिक उद्दीष्टे पुर्ण करतात.
हाव आणि भिती हे दोन घटक गुंतवणूकीत महत्वाची भुमिका बजावत असल्याने गुंतवणूकीत असंमजस वर्तणुक ही सर्वसामान्य बाब ठरलेली आहे. ज्यावेळी शेअरबाजार हा शिखरावर असतो त्यावेळी गुंतवणूकदार अधिकाधिक पैसा समभागांमध्ये गुंतवतो. बाजार आणखी वर जाईल, अशी त्याची धारणा असते. ज्यावेळी बाजार तळपातळीवर असतो त्यावेळी गुंतवणूकदार बाजार आणखी घसरण्याच्या भितीने त्याच्याजवळील समभागांची विक्री करुन टाकतो. अशा असंमजस वर्तणुकीमुळे दीर्घ कालावधीतील गुंतवणूकीच्या उद्दीष्टांना तडा बसतो. परंतु गुंतवणूक विभागणीच्या पध्दतीमुळे भावनांचा अडसर दूर होऊन गुंतवणूकीची खऱ्या अर्थाने शिस्त लागते.
विविध प्रकारच्या गुंतवणूक या वेगवेगळ्या बाजाराच्या स्थितीत चांगली अथवा खराब कामगिरी सतत करत असतात. यात समतोल नसल्यास तुमची गुंतवणूक विभागणी ही उद्दीष्टापासून भरकटते. त्यासाठी गुंतवणूकीच्या समतोलाचे महत्व उदाहरणासह समजून घेऊ या. तुम्ही एक लाख रुपयातील 70 टक्के भाग हा समभागात तर 30 टक्के भाग हा डेटमध्ये 1998 मध्ये गुंतविला असे गृहीत धरु या. पहिल्या उदाहरणात तुम्ही एक वेळ गुंतवणूक केली आहे. दुसऱ्या उदाहरणात तुम्ही दरवर्षी नियमित गुंतवणूक करत समभागातील गुंतवणूकीचे 70 टक्के तर डेटमधील गुंतवणूकीचे 30 टक्के प्रमाण कायम ठेवल्याचे गृहीत धरुया. जर तुमची समभागातील गुंतवणूक 70 टक्क्यांपुढे गेली तर अधिक गुंतवणूकीची विक्री करुन डेटमधील गुंतवणुक वाढवत उद्दीष्ट जैसे थे ठेवतात. त्याचप्रमाणे समभागातील गुंतवणूक ही 70 टक्क्यांखाली गेल्यास डेटमधील गुंतवणूक काढून ती तीस टक्क्यांवर आणतात. या दोन्ही उदाहरणात निफ्टी फिप्टी हे समभागासाठी तर निफ्टीचा दहा वर्षाचा जी-सेकचा निदेशांक हा डेटमधील गुंतवणूकीसाठी आधारभूत निदेशांक धरुया. गेल्या वीस वर्षात जर गुंतवणूक संतुलित राखली नाही तर तीत किती वाढ होते हे पहिव्या उदाहरणात पाहुया. विनासंतुलनात तुमच्या गुंतवणूकीच मुल्य 2019 च्या अखेरीस साधारण 8.8 लाख रुपयांपर्यंत वाढलेले दिसते. परंतु जर दरवर्षी गुंतवणूकीचा समतोल साधत राहीला तर तिचे मुल्य 2019 च्या अखेरीस 10.8 लाख रुपये एवढे दिसते. म्हणजेच त्यात सुमारे दोन लाख रुपयांची वाढ झालेली दिसते. ( संदभ-अॅडव्हायझरखोज रिसर्चचा 2019 चा अहवाल)
गुंतवणूकदाराने 1998 मध्ये गुंतवलिलेल्या एक लाख रुपयाच्या गुंतवणूकीचे विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये समतोल साधत केलेल्या गुंतवणुकीचे 2019 मध्ये बाजारमुल्य तपासल्यास 70 टक्के समभाग आणि 30 टक्के डेट या गुंतवणूक पध्दतीतून अधिकाधिक संपत्ती म्हणजेच निधी तयार झालेला दिसतो. तक्तातील आकडेवारीवरुनसुध्दा ही बाब लक्षात येते. या विश्लेषणातून गुंतवणूकदारांसाठी महत्वाची शिकवण मिळते आणि ती म्हणजे
1) वर उल्लेख केलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणूकीतून गेल्या वीस वर्षात दुहेरी अंकातील परतावा पदरात पडतो. म्हणजेच गुंतवणूक विभागणीआधारे तम्ही चलनवाढ अर्थात महागाईवर मात करु शकतात.
2) जोखीम आणि परतावा हे एकमेकांशी संबंधित असले तरी संपत्ती निर्माण करण्याच्या उद्दीष्टासाठी अवास्तव जोखीम उचलण्याची काहीही गरज वाही.
3) गुंतवणूक विभागणीतून जबरदस्त परतावा मिळविण्याबरोबरच जोखीमेचे संतुलन साधणे सहज शक्य आहे.
4) इष्टतम गुंतवणूक विभागणी ही 70 टक्के समभाग गुंतवणूक पध्दतीभोवती केंद्रीत ठरते.
किमान तीन वर्षात योग्य परताव्यासाठी मध्यम ते अती जोखीम उठवू शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हायब्रीड फंड हा गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय आहे. या फंडात विविध प्रकारच्या स्थिर गुंतवणूकीचे धोरण असून सेबीच्या नियमावलीनुसार विशिष्ट मर्यादेत गुंतवणूकीत लवचिकताही राखता येते. सेबीच्या नियमामुसार या फंडातील किमान 65 ते 80 टक्के गुंतवणूक ही समभाग आणि समभागांशी संबंधित साधनांमध्ये तर उर्वरित गुंतवणूक ही चलन बाजार अथवा रोख्यांमध्ये करावी लागते. आक्रमक पध्दतीने गुंतवणूक करणारे फंड हे विविध गुंतवणूक या विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासाठी काटेकोरपणे संतुलन राखतात. सध्याच्या आपल्या कर कायद्यानुसार, समभागांमध्ये 65 टक्के गुंतवणूक करणारे फंड हे करबचतीचा लाभही मिळवत आहेत. गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी, हे आक्रमक हायब्रीड फंड दीर्घ मुदतीत मर्यादीत जोखीम स्वीकारत संपत्ती निर्माण करण्याची क्षमता बाळगतात आणि गुंतवणूक करबचतीला लाभही मिळवून देतात.
- -वैभव शहा, वितरण आणि उत्पादनप्रमुख, मिराई अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर (इंडिया )