तरुण चुघ, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, बजाज अॅलियान्झ लाइफ
वैयक्तिक बचत करण्यासाठी दोन मूलभूत घटक उत्तेजन देतात – एक म्हणजे, कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे, आणि दुसरे म्हणजे गुंतवणूक करणे. गुंतवणुकीची बरीचशी उद्दिष्ट्ये दीर्घकालीन स्वरूपाची असतात आणि जीवनातील निरनिराळ्या अनिश्चिततांशी त्यांचा संबंध येतो. अनपेक्षित स्वरूपाच्या दुर्दैवी घटनांमुळे उत्पन्नावर गदा आल्यास, कुटुंबाच्या भविष्यातील योजना व आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकतात. गुंतवणुकींसाठी संरक्षण मिळाल्यास ग्राहकांना आर्थिक संकटांचा परिणाम कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. लाइफ इन्शुरन्समुळे भविष्यातील अनिश्तितेपासून संरक्षण मिळू शकते, तसेच उत्पन्नाचा स्रोत नसतानाही गुंतवणूक योजनांमध्ये सातत्य राहील, याची तरतूद करता येऊ शकते.
नियमित मासिक उत्पन्न गमावले तरी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण होतील, याची खात्री करण्यासाठी सध्या केलेल्या गुंतवणुकींमध्ये सातत्य राहील, याची तरतूद करणे गरजेचे आहे. असे करण्यासाठी, विमाकवच संबंधित जबाबदाऱ्यांसाठी व कुटुंबाच्या भविष्यातील गरजांसाठी पुरेसे ठरणारे आहे, ही काळजी घ्यावी.
त्यामुळे, संरक्षण व गुंतवणूक यांकडे स्वतंत्रपणे पाहू नये. वास्तविक, ते एकमेकांशी सुसंगत आहेत आणि कुटुंबासाठी आर्थिक स्थिरता व सातत्य यांची तरतूद करण्यासाठी एकमेकाला पूरक आहेत. उदा., गृहकर्जाच्या रकमेइतके लाइफ कव्हर घेतल्यास, कर्जाचे हप्ते भरणारी व्यक्ती हयात नसली तरी हप्ते भरण्यासाठी कुटुंबीयांना अडचण येणार नाही. खात्रीशीर उत्पन्न देणारे विमाकवच घेतलेले असल्यास, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमध्ये गुंतवणूक करणे शक्य नसतानाही, पाल्याला परदेशात शिकण्यास पाठवण्याचे एखाद्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
विमा हे साधन आर्थिक बाबींना, तसेच कुटुंबाच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांना संरक्षण देते. मग, तुमच्या कोणत्या गुंतवणुकीसाठी संरक्षणाची आवश्यकता आहे आणि कोणत्या नाही, हे तुम्ही कसे ठरवाल? गुंतवणुकीचे विभाजन जीवनातील उद्दिष्टांना अनुसरून दीर्घकालीन व अल्पकालीन असे करता येऊ शकते. अल्पकालीन गुंतवणुकी साधारणतः मर्यादित कालावधीसाठी असतात, म्हणजे एक ते तीन वर्षे, तसेच दीर्घकालीन गुंतवणुकी साधारणतः पाच वर्षे ते त्याहून अधिक कालावधीसाठी असतात. जीवनात अनिश्चितता असल्याने, अशा प्रकारे सोपे विभाजन केल्यास तुम्हाला जीवनकवच चांगले हाताळता येऊ शकते. हे कवचही दोन प्रकारचे असू शकते. अकाली मृत्यू आल्यास भविष्यातील उत्पन्नाला संरक्षण देण्यासाठी निव्वळ प्रोटेक्शन प्लान मदत करतात, तर ट्रॅडिशनल लाइफ इन्शुरन्स उत्पादने दीर्घकालीन खात्रीशीर उत्पन्न देतात. बदलते व्याजदर आणि शेअर बाजारातील तेजी-मंदी यांचा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर होणारा परिणाम या निश्चित स्वरूपाच्या उत्पन्नामुळे हाताळता येऊ शकतो, त्यामुळे आर्थिक उद्दिष्टांच्या बाबतीत मनःशांती मिळू शकते.
आदर्श स्थितीमध्ये, प्रत्येकाला सर्व प्रकारच्या अनिश्चिततांपासून संरक्षण मिळते. पण, आयुष्य अनिश्चित असते. अशा वेळी, कुटुंबाच्या गरजांचा व जीवनातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि धोक्यांपासून संरक्षण पुरवणे गरजेचे आहे. पुरेसा विमा नसल्यास – प्रत्येक उद्दिष्ट योग्य प्रकारे सुरक्षित होईल असे - काय परिणाम होऊ शकतात, याची कल्पना असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार काळजीपूर्वक नियोजन करून कवच घ्यायला हवे. कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त, जीवनात कोणतेही वळण आले तर त्यांची जीवनातील उद्दिष्ट्ये पूर्ण होतील, याची काळजी विमा घेतो.
आज, अनेक गुंतवणूक उत्पादने लाइफ कव्हरही देतात आणि ही उत्पादने तुमच्या लाइफ इन्शुरन्स कंपन्यांची नसतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा विचारात घेता, साधारणतः पाच वर्षे ते त्याहून अधिक कालावधी अशी दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने गुंतवणूक केलेली असताना, त्यांना विम्याचे संरक्षण द्यायला विसरू नका.