'सकाळ मनी' आयोजित 'वेल्थ चेक अप कॅम्प' उपक्रमाला पुणेकर नागरिकांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आणि उपनगरातील वाढती मागणी लक्षात घेऊन येत्या शनिवारी (15 फेब्रुवारी) हा उपक्रम पुण्यातील औंधमध्ये आयोजित करण्यात येत आहे. सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत "मिस-सेलिंग'च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी "हेल्थ चेक-अप' करून घेतो, त्याच धर्तीवर "वेल्थ चेक-अप' किंवा "पोर्टफोलिओ चेक-अप' करता येईल का, असा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. अशा मार्गदर्शनासाठी ‘सीएफपीं’कडून एरवी किमान 5-10 हजार रुपयांपर्यंतचे सल्लाशुल्क आकारले जाते.
पण, ‘सकाळ मनी’ने आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 7447450123 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ठेवावा. नावनोंदणी केलेल्यांना यात उपक्रमात सहभागी होता येईल. राज्याच्या इतर शहरांतही असाच उपक्रम आयोजित करण्याचा ‘सकाळ मनी’चा मानस आहे.
वार व तारीख : शनिवार, 15 फेब्रुवारी 2020
वेळ : सकाळी 10:30 ते दुपारी 4:30
स्थळ : एसआयएलसी मीडिया सेंटर, सेमिनार हॉल, चौथा मजला, बाणेर रस्ता, सकाळ नगर, गेट क्र. 1, औंध, पुणे-411007