वैशिष्ट्ये
· ‘सिट्रॉन’च्या विकास व्यवस्थापनात व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स संयुक्तरीत्या सहभागी
· सदनिकांसाठी नावनोंदणी 18 जानेवारीपासून सुरू
· दोन टॉवर्समध्ये मिळून 1 व 2 बीएचकेच्या 258 सदनिका
· 470 चौरस फूट व 656 चौरस फुटांची वापरता येण्याजोगी जागा
· सर्वसमावेशक किंमत - 1 बीएचकेः 30.5 लाख रु. आणि 2 बीएचकेः 42.30 लाख रु.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (बीएसइ स्क्रिप VASCONEQ) आणि मनीषा कन्स्ट्रक्शन्स या पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील दोन नामवंत व विश्वासार्ह कंपन्यांनी वाघोली येथे होणाऱ्या त्यांच्या ‘सिट्रॉन’ या गृहप्रकल्पाची घोषणा आज येथे केली. व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स या दोन्ही कंपन्या ‘सिट्रॉन’च्या विकास व्यवस्थापनात संयुक्तरित्या सहभागी असणार असून त्यातील सदनिकांच्या नावनोंदणीचे कामकाज येत्या 18 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. ‘सिट्रॉन’च्या ‘फेज-2’मध्ये दोन टॉवर्समध्ये मिळून 258 सदनिका असतील. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या 1 व 2 बीएचके स्वरुपाच्या या सदनिकांमधील वापरता येण्याजोगे क्षेत्रफळ अनुक्रमे 470 चौरस फूट व 656 चौरस फूट असणार आहे. 1 बीएचके सदनिकेची सर्व कर व शुल्कांसहीत किंमत 30.5 लाख आणि 2 बीएचके सदनिकेची किंमत 42.30 लाख रुपये असेल. वातानुकूलित क्लब हाऊस, अत्याधुनिक जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याची जागा, पार्टी लॉन, स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि बहुउद्देशीय हॉल अशा काही उत्तमोत्तम सुविधा या प्रकल्पात उपलब्ध असतील.
नव्या प्रकल्पाविषयी माहिती देताना ‘मनीषा कन्स्ट्रक्शन्स’चे संचालक अभिषेक खिंवसरा म्हणाले, ‘’पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन्स हे नाव गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दबदबा राखून आहे. पुण्यात आमच्या कंपनीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे केली आहेत. व्हॅस्कॉन इंजिनिअर्सशी आमचा सहयोग हाही पूर्वीपासूनचा आहे. ‘सिट्रॉन’ प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत आणि ग्राहकांना उत्कृष्ट सदनिका देण्यास कटिबद्ध आहोत.’’
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘’सिट्रॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. यापूर्वी सायट्रॉनच्या पहिल्या फेजला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आमचा हुरूप वाढून आम्ही दुसऱ्या फेजची निर्मिती करीत आहोत. गेली तीन दशके आमच्यासमवेत असणाऱ्या ग्राहकांचे आम्ही आभार मानतो. यापुढेही त्यांच्या पैशाचा मोबदला पुरेपूर देण्यासाठी आम्ही आमच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये प्रस्थापित निकष राबवून त्यांना संपूर्ण समाधान देऊ.’’
‘सिट्रॉन’ हा गृहनिर्माण प्रकल्प पाच एकर जागेत सामावला आहे. तीन फेजमध्ये तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिल्या फेजचे काम पूर्ण होऊन 2017 मध्ये तो ग्राहकांना वितरीत करण्यात आला. दुसऱ्या फेजचे काम 18 जानेवारी 2019 रोजी सुरू होईल. तिसऱ्या फेजचे काम काही काळाने हाती घेण्यात येईल.
वाघोली हा भाग पुणे-नगर महामार्गावर असून खराडी आयटी हबपासून जवळ आहे. या ठिकाणी रिअल इस्टेट, मूलभूत सोयी-सुविधा आणि शैक्षणिक संस्था यांचा जलद विकास झालेला आहे. एकेकाळी हा भाग औद्योगिक स्वरुपाचा होता, मात्र आता गुंतवणूकदार व ग्राहक या दोघांच्या प्रतिसादांमुळे येथे निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहे. वाघोली हा भाग नगर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असून येथून विमानतळ, पुणे रेल्वे स्थानक, सोलापूर महामार्ग आणि शिक्रापूर-चाकण रस्ता येथे सहजरित्या जाता येते. परवडणारे दर, सामाजिक सोयी-सुविधा आणि आयटी उद्योगांची नजीकता या वैशिष्टयांमुळे वाघोली परिसरात विकसक, गुंतवणूकदार व घर खरेदी करणारे ग्राहक यांचा नेहमीच राबता असतो.