निवडणुकांचे निकाल जसे जसे स्पष्ट होत आहेत तशी शेअर बाजारात तेजी वाढत आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने ऐतिहासिक 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने देखील पहिल्यांदाच 12 हजारांची नोंद केली आहे. आजच्या तेजीमध्ये प्रामुख्याने बँक निफ्टी निर्देशांकात तब्बल 1150 अंशांपेक्षा जास्त वाढ होऊन बँक निफ्टीने 31,705चा उच्चांक पोचला आहे.
बँक निफ्टीमध्ये खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँका आघाडीवर आहेत. यात प्रामुख्याने येस बँक, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा आणि ऍक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. त्याचबरोबर, बँक ऑफ बडोदाच्या शेअरमध्ये तब्बल 14 टक्क्यांपर्यंतची तेजी आली आहे.
मात्र दुसरीकडे, टीसीएस, वेदांता, टाटा मोटर्स, आयटीसी या कंपन्यांचे शेअर्स मात्र घसरलेले आहेत.