पुणे: "सकाळ'मध्ये अलीकडेच आयोजित केलेल्या "पोर्टफोलिओ चेक-अप कॅम्प'ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यासाठीची वाढती मागणी लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने नवे पाऊल उचलायचे ठरविले आहे. नव्या आर्थिक वर्षापासून विविध क्षेत्रांतील कंपन्या किंवा संस्था आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असा "पोर्टफोलिओ चेक-अप कॅम्प' त्यांच्या कार्यालयात आयोजित करू शकतात. यासाठी "सकाळ मनी'ची साथ त्यांना मिळू शकेल. या उपक्रमात अधिकृत परवानाधारक "सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर' (सीएफपी) असलेल्या तज्ज्ञ मंडळींकडून ("मनी डॉक्टर') आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच गुंतवणुकीबाबत मोफत मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकाला स्वतंत्रपणे पुरेसा वेळ देऊन व्यक्तिगत स्वरूपात सल्ला-सेवा पुरविण्यात येते. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन विविध कंपन्या व संस्थांना करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांनी roshan.thapa@sakalmoney.com या ई-मेलवर संपर्क साधावा. त्यात कंपनीचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्कासाठी कंपनीतील संबंधित अधिकाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, कर्मचाऱ्यांची संख्या, कॅम्पसाठी अपेक्षित तारीख यांचा उल्लेख करावा. प्रारंभीच्या टप्प्यात असा उपक्रम पुण्यातील कंपन्यांमध्ये राबविला जाणार आहे.