"सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?
औरंगाबाद: गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत "मिस-सेलिंग'च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच सामाजिक गरज लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने "वेल्थ चेक-अप'चा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत 'सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर' (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. अशा मार्गदर्शनासाठी 'सीएफपीं'कडून एरवी किमान 5-10 हजार रुपयांपर्यंतचे सल्लाशुल्क आकारले जाते. पण, 'सकाळ मनी'ने आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
प्रथमच "वेल्थ चेक-अप' कॅम्प औरंगाबादमध्ये
'सकाळ मनी'च्या माध्यमातून 'वेल्थ चेक अप कॅम्प' येत्या शनिवारी (14 मार्च) औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात येत आहे. ''सकाळ मनी'चा हा उपक्रम 14 मार्चरोजी (शनिवारी) सकाळी सकाळी 11 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत सकाळच्या औरंगाबाद कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 74474 50123 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ठेवावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर मेसेजद्वारा एक लिंक प्राप्त होईल. त्यामध्ये माहिती भरल्यानंतर नोंदणी क्रमांक प्राप्त होईल.
वार व तारीख: शनिवार, 14 मार्च 2020
वेळः सकाळी 11 ते दुपारी 4:30
स्थळ:
सकाळ औरंगाबाद कार्यालय, तिसरा मजला , प्लॉट क्र .7, सिडको, एन -1, टाऊन सेंटर, जालना रोड, औरंगाबाद - 431003