म्युच्युअल फंडात नियोजनासह
गुंतवणुकीची खास ऑनलाइन सुविधा
पुणे, ता. 13 ः गुंतवणूकविषयक तज्ज्ञांचे लेख;
तसेच गुंतवणूकदारांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याच्या
परंपरेतील पुढचे पाऊल टाकत "सकाळ मनी' आता वाचकांच्या अर्थसमृद्धीच्या वाटेवरचा
सक्रिय मार्गदर्शक ठरणार आहे. "प्रेरणा नैतिकतेची, जपणूक मूल्यांची' या तत्त्वाशी
बांधिलकी राखत "सकाळ मनी'तर्फे वाचकांना त्यांच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन
करून प्रत्यक्ष गुंतवणुकीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बदलत्या काळाची गरज ओळखून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, "सकाळ मनी' ही खास
गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू करण्यात आली असून, ती
मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असेल. मराठीत अशी सुविधा "सकाळ
मनी'च्या माध्यमातून बहुधा प्रथमच सादर केली जात आहे. याद्वारे सुरवातीला
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच म्युच्युअल फंडासह
पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे
लेखही वाचायला मिळणार आहेत.
उद्दिष्टानुसार नियोजन
"सकाळ मनी'ने आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांशी (एएमसी) सहयोग केला असून,
तज्ज्ञ टीमकडून सखोल संशोधन करून त्यांच्या योजनांची निवड करण्यात आलेली आहे.
वाचकांचे उद्दिष्ट, वय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता अशा गोष्टी जाणून घेऊन
गुंतवणुकीचे नियोजन करून मिळणार आहे आणि त्यानुसार प्रत्यक्ष गुंतवणूक करता येणार
आहे. यासाठी "सकाळ मनी'च्या वेबसाइटवर खास "ऑटोमेटेड' यंत्रणा कार्यरत करण्यात आली
आहे.
व्यापक विस्तार योजना
या ऑनलाइन
प्लॅटफॉर्मच्या बरोबरीने "सकाळ मनी'ने वाचकांच्या सोयीसाठी पुण्यासह मुंबई,
कोल्हापूर व नाशिक येथे आपल्या शाखा सुरू करून प्रशिक्षित म्युच्युअल फंड एजंटांची
(इंडिपेडंट फायनान्शियल ऍडव्हायझर्स) नियुक्ती केली आहे. "सकाळ मनी'शी सध्या 100
हून अधिक एजंट जोडले गेले असून, पुढील वर्षभरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत एक
हजार एजंट नेमण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
वाचकांना 9881099200 या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. तसेच
response@sakalmoney.com या मेल आयडीवर संपर्क साधता येईल.