बेंगळुरू, ता. 27 : इंटरनॅशनल एमएसएमई डे निमित्त सॉल्व या मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईजेजसाठी (एमएसएमई) असलेल्या बी२बी डिजिटल व्यासपीठाने भारतातील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसोबत एमएसएमई विभागासाठी तयार करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डच्या सादरीकरणाची घोषणा केली आहे.
सॉल्व एमएसएमई क्रेडिट कार्ड व्यावसायिकांना सध्या होत असलेल्या व्यवसाय खर्चांसह, पुरवठादारांचे पेमेंट्स, इंधन, लॉजिस्टिक्स, कच्च्या मालाची खरेदी, युटिलिटी पेमेंट्स आणि इतर कार्यकारी भांडवल खर्च या संदर्भात सज्ज राहण्यामध्ये मदत करते. याव्यतिरिक्त सॉल्व व्यासपीठाचे विविध लाभ मिळण्यामध्ये देखील मदत करते. सॉल्व व्यासपीठ लघु व्यवसायांना एकमेकांना मालांची देवाणघेवाण करण्यामध्ये आणि भारतभरातील त्यांचा ग्राहकवर्ग वाढवण्यामध्ये साह्य करते.
कोविड-१९ प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या मंदीमुळे एमएसएमईंना रोखव्यवहारासंदर्भात समस्यांचा सामना करावा लागत आहे. सॉल्व एमएसएमई क्रेडिट कार्ड हे अद्वितीय असण्यासोबत त्यामध्ये अनेक सानुकूल वैशिष्ट्ये आहेत. हे कार्ड लघु व्यवसायांना लघुकालीन कर्ज सुविधा उपलब्ध करून देते. या क्रेडिट कार्डला भारतातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय बँकेचे पाठबळ मिळाले आहे.
सॉल्व एमएसएमई क्रेडिट कार्ड एमएसएमईना सामील होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. यामध्ये एमएसएमई विभागासाठी तयार करण्यात आलेली कॅशबॅक आणि रिवॉर्ड वैशिष्ट्ये आहेत. तसेच या अनोख्या क्रेडिट कार्डसह एमएसएमई इंधन व्यवहारांवर ५ टक्क्यांच्या कॅशबॅकचा आनंद घेत इंधन दरवाढीमुळे झालेल्या नुकसानांची भरपाई करू शकतात. म्हणजेच त्यांना दर महिन्याला इंधनावर होणा-या ४००० रूपयांच्या खर्चासाठी दोन लिटर्सहून अधिक पेट्रोल मोफत मिळते. तसेच सूक्ष्म व लघु व्यवसाय सध्याच्या व्यवसाय वातावरणामध्ये यशस्वी होण्यासाठी जलदपणे अनिवार्य होत असलेली त्यांची डिजिटल विश्वासार्हता प्रबळ करू शकतात.
या सहयोगाबाबत बोलताना भारतातील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि अलायन्सेस, पार्टनरशिप्स व मॉर्गेजेसचे प्रमुख जिनेश शाह म्हणाले,''बँकेचा दृढ विश्वास आहे की, एमएसएमई हे देशाच्या विकासाचे इंजिन आहेत आणि भारताच्या भावी विकासलाटेला चालना देतील. आम्ही सॉल्वसोबत सहयोगाने एमएसएमई विभागाला त्यांची पूर्ण क्षमता समजण्यामध्ये मदत करण्याशी कटिबद्ध आहोत. एमएसएमईंना डिजिटली सक्षम करण्याचे आणि त्यांच्या आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधण्याचे सॉल्वचे मिशन या सहयोगी क्रेडिट कार्डच्या सादरीकरणासह अधिक पुढे जाईल. आम्हाला या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी त्यांच्यासोबत सहयोग जोडण्याचा आनंद होत आहे.''
सॉल्व एमएसएमई क्रेडिट कार्डबाबत बोलताना सॉल्वचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मित्तल म्हणाले,''सॉल्व एमएसएमई क्रेडिट कार्ड हे एमएसएमईंना त्यांच्या विकासामध्ये येणा-या आव्हानांवर मात करण्यामध्ये मदत करण्यासाठी आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामधील आणखी एक पाऊल आहे. हे क्रेडिट कार्ड लघु व्यवसायांना रोजच्या खर्चांसाठी देय भरणे व लॉजिस्टिक्स खर्च अशा संकटांवर मात करण्यामध्ये, तसेच प्रतिष्ठित, विश्वसनीय भागीदाराकडून वाजवी दरामध्ये निधी उपलब्ध करून घेण्यामध्ये मदत करेल. हे क्रेडिट कार्ड दीर्घकाळापर्यंत त्यांना त्यांच्या व्यवसायांमध्ये अधिक भर करण्यामध्ये सक्षम करेल आणि त्यांना मुक्तपणे व्यवसाय करण्यास देण्यासोबत पुरेशा प्रमाणात रोख साह्य करेल.''