इन्शुरन्सच्या मदतीने तरुणांना निरोगी व फिट ठेवणे
21व्या शतकातील तरुण मंडळी किंवा जनरेशन वाय आरोग्य व वेलनेस यापेक्षा त्यांचे स्मार्टपोन व नवे अॅप याबद्दल अधिक उत्सुक व जागरुक असते. “मी तरुण आणि निरोगी आहे. मला डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही, चाचण्या करून घेण्याची आवश्यकता नाही, मला कोणत्याही औषधाची गरज नाही. मग मला इन्शुरन्स कशासाठी घ्यायला हवा?” अशी विधाने या पिढीच्या मानसिकतेचे प्रतिक आहे.
तरुणांची मानसिकता काही असली तरी हेल्थ इन्शुरन्समुळे जीवन बदलू शकते. हेल्थ इन्शुरन्समुळे योजनाधारकांना वेलनेसचे महत्त्व सांगितले जाते, बैठ्या जीवनशैलीपेक्षा सक्रिय जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले जाते आणि त्यांच्या कामाच्या सर्व वर्षांमध्ये व त्यानंतरही चांगल्या आरोग्याची दक्षता घेतली जाते.
सुदैवाने, शहरी व ग्रामीण भागांतील तरुणांना आरोग्याला हानीकारक जीवनशैलीशी निगडित असणारे धोके लक्षात येऊ लागले आहेत आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारणे आवश्यक असल्याचे लक्षात येऊ लागले आहेत. सध्या, उशीरापर्यंत काम करणे, सक्रिय सामाजिक जीवन, चीडचीड व अपुरी झोप अशा समस्यांच्या नकारात्मक परिणामांवर अधिकाधिक लोक उपाय करू लागले आहेत आणि त्यासाठी ऑफिस वर्कआउट व आरोग्यदायी आहार, फिटनेससाठी प्रयत्न, नियमित सुट्या घेणे, साहसी खेळ, मेडिटेशनसारख्या आरामदायी पद्धती यांचा अवलंब करू लागले आहेत.
परंतु, वर नमूद केलेले सर्व मुद्दे विचारात घेता, मेडिकल इन्शुरन्सचे कवच घेतलेल्या तरुणांची संख्या अत्यंत कमी आहे. या वयोगटातील जवळजवळ एक चतुर्थांश जणांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही आणि केवळ 13% जणांकडे अपंगत्वाचे कवच आहे. केवळ 36% जणांनी अन्य इन्शुरन्स प्लान घेतले आहेत. याचा अर्थ, काहीही दुर्दैवी घडले तर 64% तरुण त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक संकटात ढकलणार आहेत .
याबरोबरच, इन्व्हेजिव्ह उपचारांबरोबर अन्य वैद्यकीय सुविधांचा खर्च कमालीचा वाढत असल्याने, तरुणांनी लहान वयात इन्शुरन्स घेतल्यास त्यांना अनेक फायदे होऊ शकतात. उदाहरणार्थ, 22-35 वर्षे वयोगटामधील व्यक्तींना कमी प्रीमिअममध्ये अधिक कव्हरेज मिळू शकते. मात्र, वय वाढल्यावर हे चित्र उलट होते.
तरुण मंडळींना इन्शुरन्सचे संरक्षण देण्याच्या हेतूने, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीए) न्यू हेल्थ इन्शुरन्स रेग्युलेशन्स, 2016 ही अधिसूचना काढली. त्यामध्ये व्यक्तीच्या वयानुसार प्रीमिअम ठरवला जातो. लहान वयात इन्शुरन्स घेणाऱ्यांना कमी प्रीमिअम भरावा लागतो आणि त्यांना नो क्लेम बोनसचा दावा करता येतो. तरुणांचे लक्ष इन्शुरन्सकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला – आणि त्यांनी विम्याचे कवच कायम ठेवावे म्हणूनही.
यातून प्रेरणा घेत, काही इन्शुरन्स कंपन्या तरुणांना इन्शुरन्स घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी वेलनेस व प्रिव्हेंटिव्ह केअर या संकल्पनांचा आधार घेत आहेत. या कंपन्या ग्राहकांशी संवाद साधतात आणि त्यांना नव्या सेवांविषयी माहिती देतात व निरोगी कसे राहावे याविषयी टिप्स देतात. कंपन्या आरोग्य शिबिरे आयोजित करतात आणि ग्राहकांना प्रीमिअमचे नूतनीकरण करण्याची तारिख सांगतात. यामुळे इन्शुरन्स कंपनी व ग्राहक यांच्यामध्ये विश्वास व नाते निर्माण करण्यासाठी मदत होते.
40-50 दशलक्ष लोकांवर आरोग्याचे सावट आहे आणि असंख्य लोक कार्डिआक समस्या, हायपरटेन्शन व डायबिटीस अशा जीवनशैली आजारांनी ग्रस्त आहेत. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारतात आहे. भारतात 22 ते 37 वर्षे वयोगटातील व्यक्तींची संख्या 356 दशलक्ष असून, मेडिकल इन्शुरन्स अत्यंत गरजेचा आहे. पुरेसा इन्शुरन्स नसताना आजारांवर उपचार करायची वेळ आली तर बचतीवर परिणाम होतो, मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, नोकरीला फटका बसू शकतो आणि कर्जबाजारी होण्याची वेळ ओढवू शकते. चांगली व योग्य हेल्थ इन्शुरन्स योजना यावर मात करण्यासाठी मदत करू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताचे भवितव्य, देशाची आर्थिक वाढ व प्रगती यांची भिस्त तरुणांच्या आरोग्यावर व वेलनेसवर आहे. या पिढीला वाय-फायविना आयुष्य काय असते ते माहीत नाही. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी या पिढीच्या गरजा व अपेक्षा विचारात घेऊन त्यांची उत्पादने व हेल्थ केअर फायदे आखावेत. तरुणांनी लवकरात लवकर इन्शुरन्स घेण्यासाठी प्रयत्न करणे, हा सर्वाचा गाभा आहे.
आनंद रॉय, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स